Home /News /career /

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग लगेच शिकून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी; यश फक्त तुम्हालाच मिळणार

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग लगेच शिकून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी; यश फक्त तुम्हालाच मिळणार

अशाच काही स्किल्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे शिकून तुम्ही यशस्वी होऊ शकता.

    मुंबई, 26 जुलै: ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्यापैकी सर्वच जण नोकरीच्या शोधात (Job search) असतात. मात्र आजकाल नोकरी मिळणं तितकं सोपं राहिलं नाही. तुमच्या शिक्षणासोबतच तुमच्या अंगी काही चांगले गुण (Good qualities)असणंही महत्त्वाचं असतं. तसंच तुमच्यात स्मार्टनेस (Smartness) किती हेही बघितलं जातं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात करिअर (Career Advice) करण्यासाठी स्वतःला सर्व दृष्टीनं तयार ठेवणं महत्वाचं आहे. त्यात तुम्हाला त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला काही सरळ आणि सोप्या गोष्टी (Soft skills to be successful) शिकणं महत्वाचं आहे. अशाच काही स्किल्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे शिकून तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. टाइम मॅनेजमेंट स्किल असं म्हणतात या जगात वेळेपेक्षा महत्त्वाची गोष्ट कुठलीच नाही. म्हणून सर्वात आधी तुमचा टाइम मॅनेज (How to manage time) करायला शिका म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला जास्त वेळ द्या तर इतर गोष्टींना कमी वेळ द्या. आपली कामं आणि ऑफिसची कामं वेळेत पूर्ण करा. वेळेचं महत्त्वं लक्षात घेऊन काम करा. यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकाल. हे वाचा -  ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS टेक्निकल ज्ञान आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या काळात तुमच्या टेक्निकल ज्ञान (Technical knowledge) असणं अतिशय आवश्यक आहे. ज्यांना टेक्निकल ज्ञान नाही अशा लोकांना कुठेही जागा मिळू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा कुठे काम करत असाल तर करिअरमध्ये समोर जाण्यासाठी तुम्हाला टेक्निकल ज्ञान मदत करू शकेल. डिजिटली स्ट्रॉंग व्हा आजकालच्या कळत टेक्नॉलॉजीसोबतच संगणकाचं (Computer knowledge) ज्ञान असणंही आवश्यक आहे. तुम्ही जिथे कुठे काम करत साला तिथे संगणक नसेल असं होऊ शकत नाही. म्हणूनच नवीन पदवीधारकानं योग्य संगणक कोर्स करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला नोकरी मिळविण्यात डिजिटल साक्षरतेचा (Digital Literacy) पूर्ण लाभ मिळेल. कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा तुमच्या बॉसशी संवाद सांधण्यासाठी तुमच्याकडे योग्य ते कम्युनिकेशन स्किल (Communication Skills) असणं आवश्यक आहे. तुमच्या बोलण्यातून तुम्ही समोरच्यांची मनं जिंकून घेऊ शकता. त्यामुळे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला यात मदत करू शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Advice, Career opportunities, Success

    पुढील बातम्या