मराठी बातम्या /बातम्या /विदेश /स्पायडर मॅन ठरतोय व्हिलन, सामान्यांना करतोय मारहाण

स्पायडर मॅन ठरतोय व्हिलन, सामान्यांना करतोय मारहाण

 स्पायडरमॅन (Spider man) हा काल्पनिक सुपरहिरो (Super hero) लहान मुलांना आव़डण्याचं कारण म्हणजे तो मोठमोठ्या संकटातून इतरांना वाचवतो आणि जगाचं रक्षण करतो. पण सध्या मात्र हा स्पायडरमॅन त्याचं हे काम विसल्याचं दिसून येत आहे.

लंडन, 26 जुलै : स्पायडरमॅन (Spider man) हा काल्पनिक सुपरहिरो (Super hero) लहान मुलांना आव़डण्याचं कारण म्हणजे तो मोठमोठ्या संकटातून इतरांना वाचवतो आणि जगाचं रक्षण करतो. पण सध्या मात्र हा स्पायडरमॅन त्याचं हे काम विसल्याचं दिसून येत आहे. लंडनमधील सुपर मार्केट (Super Market) असो किंवा गर्दीनं गजबणारे रस्ते (Crowded roads) असतो, या ठिकाणी येऊन स्पायडरमॅन सामान्य माणसांना त्रास देत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस  (London Police) सध्या या स्पायडरमॅनचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

स्पायडर मॅनच्या वेषातील एकजण लंडनमधील सुपर मार्केटमध्ये येऊन हंगामा करत असल्याचा अनुभव काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुपरमार्केटमधील कपाटांवर हा स्पायडर मॅन चढून बसतो आणि गर्दी गोळा झाली की चित्रविचित्र करामती करत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. अत्यंत आक्षेपार्ह असं वर्तन तो काही वेळा करतो, तर काही वेळा नागरिकांना मारहाणही करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. स्पायडरमॅनच्या वेषात फिरणाऱ्या या व्यक्तीचा लंडन पोलीस सध्या शोध घेत आहेत.

हे वाचा -अफगाणिस्तानात पोहोचलं पाकिस्तानी सैन्य? तालिबानींसोबत फिरतानाचा VIDEO VIRAL

ड्रामा कशासाठी?

काही दिवसांपूर्वी स्पायडरमॅन, बॅटमॅन आणि इतर सुपरहिरोंच्या वेषातील एक टोळी रस्त्यानं फिरताना नागरिकांना त्रास देत असे. एका महिलेच्या चेहऱ्यावर यातील एकानं बुक्की मारून तिला जखमी केले होते. या प्रकरणाची तक्रारही दाखल झाली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले होते. आता सुरु झालेल्या प्रकारामागे याच मंडळींचा हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. केवळ सोशल मीडियावर अधिकाधिक हिट्स आणि लाईक्स मिळवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. लवकरच या व्हिलन ठरणाऱ्या स्पायडरमॅनला अटक करून त्याला अद्दल घडवण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

First published:

Tags: Crime, London