नवी दिल्ली 26 जुलै : अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याच्या बातम्यांदरम्यानच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. यात स्पष्टपणे दिसतं, की पाकिस्तानी सैन्याचे जवान तालिबानींच्या नियंत्रणातील भागात दहशतवाद्यांसोबत उभा आहेत (Pakistani Troops in Areas Under Taliban Control). हा व्हिडिओ (Video) अफगाणिस्तानची एक वृत्तसंस्था आरटीए वर्ल्ड यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की तालिबानींच्या नियंत्रणातील भागात पाकिस्तानी सैनिकांचा वावर. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या हद्दीतील स्पिन बोल्डकमधून नजर सुरक्षा पोस्टमधून डूरंट सीमा पार (Pakistani Forces Crossed Durand Line) केली आहे. डूरंट ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या मधील सीमा रेशा आहे.
पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट, ड्रोन हल्ल्यांमागचं खरं कारण
14 जुलै रोजी तालिबानींनी असा दावा केला होता, की त्यांनी अफगाणिस्तानच्या महत्त्वपूर्ण ''स्पिन बोल्डक क्रॉसिंग''वर कब्जा केला आहे. कंधारचं 'स्पिन बोल्डक' पाकिस्तानच्या चमन शहराला लागून असलेल्या अफगाणच्या सीमेचा एक महत्त्वाचा राजकीय बिंदू आहे. याच्याच माध्यमातून दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. तालिबानी दहशतवाद्यांनी मागील काही आठवड्यातच अनेक जिल्ह्यांवर कब्जा केला आहे.
#Kandahar: Pakistani troops movement in areas under Taliban control. The video shared on social media shows Pakistani forces crossed the Durand Line into the Afghan soil, by the 'Nazar Security Post', in Spinboldak of the province. #Afghanistan pic.twitter.com/1H3DN9Bv37
— RTA World (@rtaworld) July 24, 2021
LIVE VIDEO: दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू; दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकेल
हा व्हिडिओ अशावेळी समोर आला आहे, जेव्हा अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी 15 जुलै रोजी आरोप केला होता, की पाकिस्तानची वायुसेना चमन आणि स्पिन बोलडाकच्या सीमावर्ती भागात तालिबानी दहशतवाद्यांची मदत करत आहे. मात्र, पाकिस्ताननं या गोष्टीला नेहमीच नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan army, Taliban, Video viral