मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

aryan khan: बॉलीवूडकरांसाठी संकटमोचक ठरणारे सतीश माने शिंदे आहेत तरी कोण?

aryan khan: बॉलीवूडकरांसाठी संकटमोचक ठरणारे सतीश माने शिंदे आहेत तरी कोण?

बॉलीवुडकरांसाठी संकटमोचक ठरणारे वकील सतीश माने शिंदे आहेत तरी कोण?

बॉलीवुडकरांसाठी संकटमोचक ठरणारे वकील सतीश माने शिंदे आहेत तरी कोण?

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी मुंबईतील (mumbai) एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा ( (Mumbai cruise rave party)) डाव उधळून लावला. यावेळी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ( Bollywood actor Shah Rukh Khan's son))अन्य 8 जणांना ताब्यात घेतले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 04 ऑक्टोबर : ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Bollywood actor Shah Rukh Khan's son) आठ जणांना रविवारी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानला आणखी 3 दिवस कस्टडी त राहावं लागणार. आर्यनची सुखरुप सुटका व्हावी यासाठी शाहरुख प्रयत्न करत असून त्याने प्रसिद्ध वकील सतीश मान-शिंदे यांची मदत घेतली आहे. यापूर्वीही सतीश माने-शिंदे अनेक बॉलीवुडकरांच्या केस हाताळल्या आहेत. सिनेसृष्टीतील सर्वात प्रभावी वकील म्हणून आणि बॉलीवुडकरांसाठी संकटमोचक म्हणून सतीश माने शिंदे  (Satish Maneshinde)यांच्याकडे पाहिले जाते आहे.

हे वाचा- Mumbai Drug Bust LIVE Updates: आणखी 3 दिवस आर्यन शाहरुख खान राहणार कोठडीत

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी मुंबईतील (mumbai) एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा ( (Mumbai cruise rave party)) डाव उधळून लावला. यावेळी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ( (Bollywood actor Shah Rukh Khan's son))अन्य 8 जणांना ताब्यात घेतले. आपल्या मुलाची बाजू मांडण्यासाठी शाहरुखने संकटमोचक वकील सतीश माने शिंदे यांना हाक दिली आहे. त्यांनीही पहिल्याच दिवशी आर्यन खानची बाजू कोर्टात जोरदार लढवली. NCB ने 13 तारखेपर्यंत कोठडीची मागणी केली होती. पण माने शिंदेंमुळे तीन दिवसांवर निभावलं. आता आर्यनला 7 तारखेपर्यंत कस्टडीत राहावं लागेल.

तर कोण आहेत सतीश मान-शिंदे?

सतीश माने शिंदे यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची बाजू कोर्टात मांडली आहे. माने-शिंदे यांनी आतापर्यंत सलमान खान, संजय दत्त, रिया चक्रवर्ती यांची बाजू कोर्टात मांडून त्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुखरुप सुटका केली आहे.

56 वर्षीय सतीश मानशिंदे लॉ ग्रॅजुएट फ्रेशर म्हणून मुंबईत आले होते. मुळचे धारवाडचे रहिवासी असणारे मानशिंदे 1983मध्ये नोकरीच्या शोधात होते. त्यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध क्रिमीनल लॉयर राम जेठमलानी यांच्याकडे नोकरीला सुरूवात केली. मानशिंदेंनी जेठमलानी यांच्या अंतर्गत कनिष्ठ वकिल म्हणून कार्यरत असताना त्यांनी 10 वर्ष दिवाणी आणि गुन्हेगारी कायद्याची प्रॅक्टीस केली. यात त्यांनी दिग्गज नेते, अभिनेत्यांकडून केस लढवल्या.

हे वाचा- Big Bossची चावडीच double ढोलकी; आदर्श शिंदेनं चावडीचीच घेतली शाळा

१९९३च्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक झाली होती. यावेळी त्यांनीच संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढलं होतं. तेव्हापासून सतीश मानशिंदे चर्चेत आले होते. मुंबईतील एक प्रसिद्ध वकील आणि विश्वासनीय चेहरा म्हणून सतीश माने-शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं.

2002 साली ड्रंक अॅंड ड्रायव्हिंग प्रकरणी बी टाउनचा भाईजान सलमान खान याचीही त्यांनी जामिनावर सुटका केली होती. तसेच, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपुत प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवती आणि शोइकला एनसीबीने अटक केली होती. तेव्हा माने-शिंदे यांनी दोघांची जामिनावर सुटका केली होती.

माने शिंदेची फीदेखील गलेलठ्ठ

अनेक हायप्रोफाईल केसमध्ये सतीश मानशिंदेंची वकील म्हणून नियुक्ती होते. विश्वासू सेलिब्रिटी वकील म्हणून ओळखले जाणारे मानशिंदेची फिसही गलेलठ्ठ आहे. बॉलिवूड लाईफच्या एका अहवालानूसार सतीश मानशिंदेंची एका दिवसाची फी तब्बल 10 लाख रूपये इतकी आहे. अनेक हायप्रोफाईल केसनंतर मानशिंदे आता आर्यन खानची बाजू लढवत आहेत.

First published:

Tags: Aryan khan, Drugs, Salman khan, Shahrukh khan, Sushant singh raajpoot