मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Mumbai Drug Bust LIVE Updates:NCB नं 13 ऑक्टोबर पर्यंत मागितली होती आर्यनची कस्टडी, पण कोर्टाने 7 तारखेपर्यंत दिली कस्टडी

Mumbai Drug Bust LIVE Updates:NCB नं 13 ऑक्टोबर पर्यंत मागितली होती आर्यनची कस्टडी, पण कोर्टाने 7 तारखेपर्यंत दिली कस्टडी

 ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबीनं  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह  (Bollywood actor Shah Rukh Khan's son)  आठ जणांना रविवारी अटक केली. आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले.

पुढे वाचा ...

मुंबई,  4 ऑक्टोबर: एनसीबीने (NCB raid) मुंबईहून गोव्याच्या  (Mumbai Drug Bust LIVE Updates) दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स (large quantity of drugs) जप्त केली आहेत. एनसीबीनं या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह  (Bollywood actor Shah Rukh Khan's son)  आठ जणांना रविवारी अटक करण्यात आली. आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आज आर्यनसह इतर सात आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीनं  13 ऑक्टोबर पर्यंत आर्यनची कस्टडी मागितली  होती. मात्र आता कोर्टाने  7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीला आर्यनची कस्टडी दिली आहे.  त्यामुळे आर्यनला आणखी तीन दिवस कस्टडीत राहवे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.  आर्यन खानसह अन्य तीन आरोपींना सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.

यावेळी एनसीबीच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यावेळी आर्यनसह तिन्ही आरोपी विदेशातील ड्रग्स संपर्कात असल्याचा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी केला.''आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका ड्रग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील चॅट सापडले आहे. यत्यामधून धक्कायदायक माहिती पुढे आली असून काही जणांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी हे विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.'' त्यामुळे एनसीबीकडून तिन्ही आरोपींची एनसीबी कोठडी मागण्यात आली आहे.

आर्यन खानची बाजू मांडत वकील सतीश मनेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले की,  आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. “आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. तसेच जप्ती करताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडलेले नाही. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

वाचा : NCB च्या ताब्यात असलेला आर्यन रडतोय ढसाढसा, शाहरुखसोबत फोनवर झालं बोलणं

आर्यन खान कोर्टात दाखल  झाला तेव्हा त्याच्यासोबत मुनमुन आणि अरबाजही कोर्टात होते. एनसीबीने 13 ऑक्टोबर पर्यंत कस्टडी मागितली आहे. एनसीबीने  तिघांचीही कस्टडी मागितली आहे. या तिघांनाही  3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. आणखी 5 जणांची अटक करणयात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. कोर्टासमोर त्यांना दाखल केल जाणार आहे. सध्या 3 जणांना कोर्टात आणण्यात आलं आहेव 13 ऑक्टोबर पर्यंत  एनसीबीने  रिमांड मागितली होती. मात्र आता कोर्टाने  7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीला आर्यनची कस्टडी दिली आहे.  त्यामुळे आर्यनला आणखी तीन दिवस कस्टडीत राहवे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment