मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Big Boss Marathi 3: भली मोठी पोस्ट लिहीत; आदर्श शिंदेने घेतली चावडीचीच शाळा

Big Boss Marathi 3: भली मोठी पोस्ट लिहीत; आदर्श शिंदेने घेतली चावडीचीच शाळा

#BigBoss ची चावडीच double ढोलकी;  आदर्श शिंदेने चावडीचीच घेतली शाळा

#BigBoss ची चावडीच double ढोलकी; आदर्श शिंदेने चावडीचीच घेतली शाळा

मराठी बिग बॉस(Bigg Boss Marathi 3) सीजन मधील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या चावडीची चर्चा जोरदार रंगली आहे. आठवडाभर स्पर्धकांनी ज्या चूक केल्या त्यावर चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 04 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे मराठी बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 3) सीजन मधील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या चावडीची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यातच आठवडाभर स्पर्धकांनी ज्या चूक केल्या त्यावर चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. या टास्कमध्ये कॅप्टन असलेल्या उत्कर्ष शिंदेला (Utkarsh Shinde ) महेश मांजरेकर यांनी खडेबोल सुनावले. यानंतर सध्या सोशल मीडियावर उत्कर्षचा (Utkarsh Shinde ) भाऊ आदर्श शिंदेची (adarsh shinde)पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने #BigBossची चावडीच double ढोलकी असल्याचे म्हटले आहे.

बिग बॉसच्या चावडीचा एपिसोड झाल्यानंतर आदर्शने एक पोस्ट शेअर करत आपण पण घेऊच… शाळा… माझ्या या चावडीवर..’असे म्हटले होते. आता आदर्श त्याच्या चावडीवर काय मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.

हे वाचा- 'Bigg Boss Marathi 3' च्या चावडीनंतर आदर्श शिंदेची भावाच्या समर्थानार्थ पोस्ट..

दरम्यान, आदर्शने भली मोठी पोस्ट लिहीत, चावडीचीच शाळा घेतली आहे. त्याले आपला भाऊ उत्कर्ष शिंदेची बाजु मांडत 'BigBoss च्या घरात मला चावडी पण double dholkich दिसते. कारण आता खेळच double dholki झालाय.' असे म्हटले आहे.

#BigBossची चावडीच double ढोलकी.

मी आज माझी आणि माझ्या वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची मतं माझ्या चावडीत मांडणार आहे.

चला सरळ मुद्द्यावर बोलेन.

सुरवातीला “उत्कर्ष शिंदे” याचे विचार “विशाल” या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर captaincy task साठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष double game खेळतोय म्हणजेच “डबल ढोलकी” आहे असा अर्थ काढण्यात आला.

मित्रांनो,

हा खेळ सुरवातीला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचाच खेळ आहे कारण काही tasks तसेच आहेत जे group ने खेळावे लागतात. विशालने captaincy Task मधे उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्षनीही परतफेड म्हणून विशालला Nomination प्रक्रियेत त्याच्या नावाची पाटी न तोडता म्हणजेच nominate न करता safe ही केलं आणि ते विशालच्या नंतर लक्षात ही आलं. पण चावडीला हा fair game दिसला नाही? आणि काही प्रेक्षाकांना ही कळावं म्हणून सांगतोय की BigBoss च्या घरात मला चावडी पण double dholkich दिसते. कारण आता खेळच double dholki झालाय. असे मत त्याने त्याच्या भरवलेल्या चावडीवर मांडले आहे.

तो सगळ्यात पार्शियल संचालक असल्याच म्हणत त्याला खडेबोल सुनावले. यानंतर सोशल मीडियावर उत्कर्षच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. यानंतर त्याचा भाऊ आदर्श शिंदेने त्याला पाठिंबा दिला आहे. आता आदर्शच्या या पोस्टवर महेश मांजरेकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

यासोबतच महेश मांजरेकर यांनी कान टोचल्यानंतर उत्कर्ष त्याच्या वागण्यात काही बदल करणार का, हे देखील येणाऱ्या काळात समजेल. यासोबतच आजच्या चावडीवर देखील काय होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

First published:

Tags: Big boss, Bigg boss marathi