मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'अमृतापासून वेगळं होणं हे...', 16 वर्षांनंतर सैफने व्यक्त केलं दु:ख

'अमृतापासून वेगळं होणं हे...', 16 वर्षांनंतर सैफने व्यक्त केलं दु:ख

सैफ आणि अमृताचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही आणि 2004 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. अमृताशी नातं संपवल्यानंतर आपल्या मुलांना याबाबत सांगणं सैफला अतिशय कठिण गेल्याचं त्याने म्हटलंय.

  मुंबई, 10 फेब्रुवारी : 80-90 च्या दशकात अनेक चित्रपटातून भूमिका साकारेलली अभिनेत्री अमृता सिंह (Amrita Singh) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत होती. आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिलेल्या अमृताची सैफ अली खानशी (Saif Ali Khan) 'बेखुदी' चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर प्रेम झालं आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं आणि सारा अली खान आणि इब्राहिम अली खानचा जन्म झाला. परंतु सैफ आणि अमृताचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही आणि 2004 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. अमृताशी नातं संपवल्यानंतर आपल्या मुलांना याबाबत सांगणं सैफला अतिशय कठिण गेल्याचं त्याने म्हटलंय. सैफ आणि अमृताच्या घटस्फोटानंतर तब्बल 16 वर्षांनी 2020 मध्ये सैफने एका मुलाखतीमध्ये अमृताशी झालेल्या घटस्फोटाबाबत सांगितलं होतं, ज्यात त्याने याबाबत आपल्या मुलांना सांगण किती कठिण होतं, याबाबत खुलासा केला. ही जगातील सर्वात खराब गोष्ट असल्यासारखी होती, जी आजही मला जाणवते. मला वाटत नाही मी कधीही यातून ठिक होईन, काही गोष्टी अशा आहेत, ज्या आजही मला यातून बाहरे काढत नाहीत. परंतु आता काही गोष्टी बदलत असल्याचंही त्यांने सांगितलं.

  (वाचा - Uttarakhand Glacier Burst:टनलमध्ये कसे जीवंत राहिले मजूर;त्या घटनेची भयंकर कहाणी)

  मॉर्डन फॅमिलीबाबत बोलताना त्याने सांगितलं की, कोणत्याही मुलाला त्याच्या कुटुंबापासून लांब करू नये. यामुळे मुलांवर वाईट परिणाम होतो. अनेकदा परिस्थिती वेगळी असते. आई-वडिल सोबत नसल्याने मुलांना अनेक समस्या येतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत मुलांना एक चांगलं घर आणि वातावरण मिळणं आवश्यक आहे, असंही तो म्हणाला. दरम्यान, सैफने 1991 मध्ये वयाने 12 वर्ष मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. परंतु 2004 मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर 2012 मध्ये सैफने 10 वर्ष लहान असलेल्या करिना कपूरसोबत लग्न केलं. करिना आणि सैफ बॉलिवूडमधील पॉप्युलर कपलपैकी एक मानलं जातं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bollywood, Saif Ali Khan, Sara ali khan

  पुढील बातम्या