जाहिरात
मराठी बातम्या / देश / Uttarakhand Glacier Burst: टनलमध्ये कसे जीवंत राहिले मजूर; सांगितली त्या घटनेची भयंकर कहाणी

Uttarakhand Glacier Burst: टनलमध्ये कसे जीवंत राहिले मजूर; सांगितली त्या घटनेची भयंकर कहाणी

Uttarakhand Glacier Burst: टनलमध्ये कसे जीवंत राहिले मजूर; सांगितली त्या घटनेची भयंकर कहाणी

जवळपास 10 ते 12 मजूर, इलेक्ट्रिशियन, इंजिनियर आणि दगड फोडणारे मजूर रविवारी सकाळी 8 वाजता सुरुंगात काम करण्यासाठी गेले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तराखंड, 10 फेब्रुवारी : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमकडा कोसळून आलेल्या महापूरात अद्यापही 170 लोक बेपत्ता आहेत. यापैकी अनेक मजूर तपोवनमध्ये हायडल पॉवर प्रोजेक्टवर काम करत होते. नदीमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे प्रोजेक्टच्या दोनपैकी एका सुरुंगात अडकलेल्या मजूरांना रविवारी वाचवण्यात आलं. तर दुसऱ्या सुरुंगात अडकलेल्या मजूरांपर्यंत पोहचण्याचं काम सुरू आहे. यादरम्यान जे मजूर या टनलमधून सुरक्षित बाहेर आले आहेत, त्यांनी टनलमध्ये स्वत: कसं जीवंत ठेवलं याबाबत सांगितलं आहे. काही मजूर जवळपास 7 तासांपर्यंत टनलमध्ये अडकले होते. त्यांना रविवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास वाचवण्यात आलं. हिंदुस्तान टाईम्स च्या रिपोर्टनुसार, या दरम्यान ते टनलमध्ये स्वत:ला गरम ठेवण्यासाठी व्यायाम करत होते. गरम कपडे एकमेकांना देत होते. स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी उर्दूचे दोहे बोलत होते. तसंच गाणीदेखील बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. टनलमध्ये एका एस्केवेटर आणि मोबाईल फोनला असलेल्या नेटवर्कमुळे त्यांना आपण जीवंत राहू अशी आशा होती. या सर्वांना एका इमरजेन्सी दरवाज्यातून वाचवण्यात आलं. जवळपास 10 ते 12 मजूर, इलेक्ट्रिशियन, इंजिनियर आणि दगड फोडणारे मजूर रविवारी सकाळी 8 वाजता सुरुंगात काम करण्यासाठी गेले होते. नेपाळमधून आलेल्या चित्र बहादूरने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10.45 वाजता काही लोक सुरुंगातून पळत होते आणि येथून पळा असंही सांगत होते. याबाबत काही समजण्यापूर्वीच टनल पूराने बंद झाला. त्यानंतर सर्वजण पाण्यात होते. त्यापैकी 9 मजूरांनी भिंतीला असलेल्या लोखंडी रॉडला पकडून वर येण्याचा प्रयत्न केला. टनलची उंची 6 मीटर आहे. पाण्याचा स्तर वाढत होता. तसं ते लोक उंचावर जाऊन थांबले. दोघांना पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेलं होतं. त्यांना कसंबसं वाचवल्याचं त्यांनी सांगितलं. टनल बंद झाल्यानंतर अंधार झाला होता. काहीच पाहता येत नव्हतं. सर्वांनी पाण्यात पोहून टनलच्या तोंडापर्यंत जाण्याचा विचार केला होता. परंतु तेथे मोठ्या प्रमाणात मलबा जमा झाल्याने असं करणं शक्य नव्हतं. एक्सेवेटरचे ड्रायव्हर राकेश भट्ट यांनी सांगितलं की, सर्वांनी 10-10 मिनिटांसाठी तीन-तीन लोक मिळून वाहनाच्या छतावर बसण्याचं ठरवलं. त्यामुळे सर्वांना थोडा आराम मिळेल. स्वत:ला गरम ठेवण्यासाठी व्यामाम करत होते. सर्वांनी मिळून दोन ग्रुप केले आणि जीवंत बाहेर पडण्यासाठी टनलच्या तोंडाकडे येण्यास सुरुवात केली. मलबा आणि पाणी असल्यामुळे टनलच्या भिंतीला असलेल्या लोखंडी रॉडला पकडून सर्व जण पुढे येत होते. 300 मीटर पुढे येण्यासाठी 2 तास लागले असल्याचं त्यांनी सांगितलं. काही वेळाने पाणी कमी होऊ लागलं आणि टनलच्या तोडांशी असलेली माती, मलबाही कमी होऊ लागला. बाहेरील हवाही यात येऊ लागली. वेल्डर पवारने सांगितलं की, त्यांच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येत होतं. मोबाईलमध्ये नेटवर्क असल्याने एनटीपीसी अधिकाऱ्यांना फोन करुन लोकेशनबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर त्यांना वाचवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात