मुंबई 25 ऑगस्ट : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar) हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. काही चित्रपटांत त्यांनी एकत्र काम देखील केलं आहे. तसेच जास्तीत जास्त कॉमेडी चित्रपटांत ते दिसले आहेत. जसे की, ‘हे बेबी’ (Hey Baby), हाऊसफूल सीरिज (Housefull). पण खऱ्या आयुष्यातही ते तितकेच मजेशीर आहेत. तर अक्षयला लोकांची फिरकी घ्यायला आवडते हेही आता सगळेच जाणतात. असाच प्रसंग एकदा अभिनेत्री विद्या बालन आणि रितेश देशमुखसोबतही त्याने केला होता.
2007 साली विद्या (Vidya Balan), रितेश आणि अक्षय ‘हे बेबी’ या चित्रपटासाठी एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या सेटवर अनेक गमती जमती केल्या होत्या. त्यातीलच एक त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) सांगितला होता. रितेशने सांगितलं की अक्षयने त्याच्या फोनवरून विद्याला रोमँटीक मेसेजेस पाठवून प्रपोजचा बनाव केला होता.
'नशे सी चढ गई..' आईच्या बर्थडे पार्टीत रणवीरचा दीपिकासोबत बेधुंद डान्स; VIDEO Viral
रितेश म्हणाला, “‘हे बेबी’च्या वेळेस अक्षयने माझा फोन घेऊन विद्याला रोमँटीक मेसेज केले. आय लव्ह यू वेरी वेरी मच... या मेसेजसोबत अनेक किस देखील पाठवले होते.” पुढे तो म्हणाला, “आम्हा दोघांचंही लग्न झालं नव्हतं. पण तिने रिप्लाय करत किस इमोजी पाठवले. मला वाटलं हे काय होतंय. विद्याचा मेसेज आणि तो ही किस. नंतर मी माझा मेसेज पाहिला. मी म्हटलं हो कोणी पाठवलं तर हा मागून हसत होता. बहूतेक विद्याचा फोनही अक्षयकडेच होता.”
अमायरा दस्तुरच्या BIKINI LOOKवर होतेय टीका; फोटोंवर चाहत्यांचा संताप
यानंतर कपिल शर्माने अक्षयला विचारलं “काय मिळतं असं करून”, त्यावक अक्षय म्हणाला, “काय मिळतं.. मस्ती असते, मस्ती केली पाहिजे की नाही?” त्यानंतर सगळेच हसू लागतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood News, Entertainment, Riteish Deshmukh, The kapil sharma show, Vidya Balan