मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'नशे सी चढ गई..' आईच्या बर्थडे पार्टीत रणवीरचा दीपिकासोबत बेधुंद डान्स; VIDEO Viral

'नशे सी चढ गई..' आईच्या बर्थडे पार्टीत रणवीरचा दीपिकासोबत बेधुंद डान्स; VIDEO Viral

अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh)  एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो अगदी बेधुंद होऊन पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  सोबत डान्स करताना दिसत आहे.

मुंबई 24 ऑगस्ट : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) कधी कोणती स्टाईल करेन याचा काही नेम नाही. पण तो कधी कोणती गोष्ट करेन यावरही काही सांगता येत नाही. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो अगदी बेधुंद होऊन पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  सोबत डान्स करताना दिसत आहे.

नुकताच रणवीरच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी त्याने मुंबईतील एका आलिशान हॉटेल मध्ये नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसाठी लहानशी पार्टी ठेवली होती. नेहमी प्रमाणे तो आपल्या हटके आणि आगळ्या वेगळ्या शैलीत पार्टीलाही पोहोचला होता. यावेळी दीपिका देखील त्याच्यासोबत होती.

महेश मांजरेकरांवर झाली कर्करोग शस्त्रक्रिया; प्रकृती सुधारताच होणार कामावर रुजू

पार्टीत रणवीर बेधुंद होऊन नृत्य करत होता. ‘नशे सी चड गई’ या त्याच्यावरच चित्रित झालेल्या गाण्यावर त्याने अफलातून नृत्य केलं. दीपिका सोबत तो मस्ती करताना दिसला. मात्र दीपिकाने डान्स केला नाही. तर पूर्णवेळ ती रणवीरला पाहत होती. (Ranveer singh Funny dance video)

यानंतर त्याने आपल्या आईसोबत देखील डान्स केला. त्यामुळे रणवीर च्या या डान्स ने पार्टीत सहभागी झालेले सगळेच पाहुणे भारावून गेलेले पाहायला मिळत होते. रणवीर सोबत त्याच्या आईनेही नृत्य केलं. आई मुलाच्या या नृत्याकडे सारेच पाहू लागले.

रणवीर नेहमीच एनर्जॆटीक आणि उत्साही दिसतो. त्याच्या स्टाईल मुळे तो नेहमी चर्चेत देखील राहतो. यावेळी त्याने टॉर्न जीन्स आणि हटके जॅकेट परिधान केल होतं. दीपिकाने ही लेदर पँट आणि फुल साइज रेड शर्ट परिधान केलं होतं. त्यामुळे दोघेही यावेळी मिसमॅच अंदाजात दिसून आले.

First published:

Tags: Bollywood actor, Deepika padukone, Entertainment, Ranveer sigh