मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /वनिता खरातच्या लग्नात विशाखा सुभेदारनं नेसलेली साडी होती खूपच स्पेशल; खासियत आली समोर

वनिता खरातच्या लग्नात विशाखा सुभेदारनं नेसलेली साडी होती खूपच स्पेशल; खासियत आली समोर

vishakha subhedar

vishakha subhedar

विशाखानं वनिताच्या लग्नात नेसलेली साडी ही तिच्यासाठी खूप खास आहे. कारण ती साडी तिनं विकत घेतलेली नसून तिला एका खास चाहत्यानं ती भेट दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातचं नुकतंच लग्न झालं. लग्नासाठी हास्यजत्रेची संपूर्ण टीम गेली होती. अभिनेत्री विशाखा सुभेदारनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं वनिता खराच्या लग्नातील तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विशाखानं निळ्या रंगाची खास साडी नेसली आहे. वनिताच्या लग्नात विशाखानं नेसलेली साडी तिच्यासाठी खूपच खास होती. ती खास का आहे याचं कारण तिनं पोस्ट लिहित सांगितलं. विशाखा सुभेदार तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. पण विशाखा सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. अनेक रील्स ती शेअर करत असते. तिच्या रील्सना चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशात तिनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विशाखानं वनिताच्या लग्नात नेसलेली साडी ही तिच्यासाठी खूप खास आहे. कारण ती साडी तिनं विकत घेतलेली नसून तिला एका खास चाहत्यानं ती भेट दिली. ती व्यक्ती म्हणजे भारतरत्न गानकोकीळा स्वर्गीय लता मंगेशकर. दीदींचा आज पहिला स्मृर्तीदिन आहे. यानिमित्तानं विशाखानं त्यांच्याबरोबरची खास आठवण सर्वांबरोबर शेअर केली. विशाखानं आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोडला असला तरी कोरोनाच्या काळात हास्यजत्रेनं सर्वांचं मनोरंजन केलं होतं. त्या वेळी विशाखानं एका उर्दू गायिकेची भूमिका साकारली होती. जी पाहून स्वत: लता दीदींनी विशाखाचं कौतुक करत तिला खास भेट म्हणून साडी पाठवली होती.

हेही वाचा - Lata Mangeshkar Death Anniversary : 'आंघोळीला गेली, साबण लावला आणि ...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या त्या अवस्थेत लता दीदींनी केली होती अशी मदत

लता दीदी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी आणि गाणी आपल्याबरोबर आहेत. विशाखानं त्यांच्याबरोबरची ती आठवण शेअर करत म्हटलंय, 'आज हा फोटो माझा नाही तर या मी नेसलेल्या साडीचा आहे. हे वस्त्र नाही हा आशीर्वाद आहे. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा.  हास्यजत्रेमधलं उर्दू गायिका हे पात्र निभावलेले ते स्किट त्यांना प्रचंड आवडलं. त्या म्हणाल्या, तू उर्दू बोललीयस ते फार छान बोललीयस. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेयत. त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरच खुप छान जमवलंस आणि त्यांनीही नाटकात काम केलं त्या वेळेस झालेली गंमत देखील सांगितली. त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला'.

विशाखानं पुढे लिहिलंय, कोविड प्रकरण निवळलं की आम्ही भेटायला जाणार होतो पण दुर्दैव. राहून गेलं. त्या आपल्यात नाहीयत पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो..! अंगाई ते म्हातारपण सगळ्या वयाशी त्यांचा आवाज त्यांची गाणी कनेक्ट होतात आणि त्या सर्वश्रेष्ठ बाईंचा, लतादीदींचा,आम्हाला फोन आला..! त्यांनी फोन वर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत. तो दिवस न विसरण्यासारखा होता. ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होत ते मी शब्दात नाही सांगू शकत. देवाचे आभार मानले, लताबाईंचे नाव घेतलं त्यांना सांगितलं "तुम्ही दिलेली साडी नेंसतेय."

First published:

Tags: Lata Mangeshkar, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial