मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Lata Mangeshkar Death Anniversary : 'आंघोळीला गेली, साबण लावला आणि ...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या त्या अवस्थेत लता दीदींनी केली होती अशी मदत
Lata Mangeshkar Death Anniversary : 'आंघोळीला गेली, साबण लावला आणि ...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या त्या अवस्थेत लता दीदींनी केली होती अशी मदत
प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असूनही लता मंगेशकर आपल्या कामाप्रति अत्यंत प्रामाणिक आणि नम्र होत्या.
लता मंगेशकर या माणूस म्हणूनही किती मोठ्या होत्या याचा अनुभवही वहीदा रेहमान यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, 'बांगलादेश दौऱ्यात आमच्याबाबतीत एका मजेशीर घटना घडली, जी मी कधीच विसरू शकत नाही'.
2/ 9
'आम्ही कार्यक्रमासाठी ढाक्याला गेलो तेव्हा तिथं लष्कराच्या क्वार्टर्समध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. आमच्यासोबत सुनील दत्त, नर्गिस, माला सिन्हा यांच्यसह लताजी आणि मधुमतीही तिथे होत्या'.
3/ 9
'मी आणि नर्गिसजी जिथं राहत होतो, त्या क्वार्टरमध्ये पाणीपुरवठा नीट होत नव्हता. दोन दिवस आम्हाला आंघोळीला पाणी मिळालं नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते'.
4/ 9
'माला सिन्हा आणि लताजींच्या क्वार्टरमध्ये 24 तास पाणीपुरवठा होता. दोघींना वेगवेगळ्या खोल्या मिळाल्या होत्या'.
5/ 9
'शेवटी मी नर्गिसजींना म्हटलं, की आता मी लताजी आणि मालाजी यांच्याकडे जाऊन त्यांच्या खोलीत आंघोळ करण्याची परवानगी मागते'.
6/ 9
'मी लताजींच्या खोलीत गेले आणि त्यांना विचारलं, की मी त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करू शकते का? त्यांनी लगेच परवानगी दिली'.
7/ 9
'मी कपडे घेऊन आले आणि आंघोळीला गेले. मी साबण लावला आणि पाणी गेलं. नाईलाजाने मी लताजींना मदतीसाठी हाक मारली'.
8/ 9
'त्या माझ्यापेक्षा वयानेही 10 वर्षांनी मोठ्या, गायिका म्हणूनही प्रसिद्ध; पण हे सगळं मला मदत करताना कुठेही आड आलं नाही. लताजींनी माला सिन्हा यांच्या खोलीतून काही बादल्या पाणी आणलं आणि मला दिलं'.
9/ 9
'एखादी चांगली व्यक्ती जशी दुसऱ्या व्यक्तीला मदत करते, त्याच सहजतेनं त्यांनी मला मदत केली. नर्गिसजींना जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा त्याही थक्क झाल्या'.