मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल याच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहेत मात्र या दोघांनीही त्यांच्यात असं काहीच नसल्याचं म्हणत या चर्चा फेटाळल्या. पण नुकताच आथियाच्या बर्थडे ला केएल राहुलनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास फोटो शेअर करत आथिलाया शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. त्याच्या हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी या दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं होत. आथिया आणि राहुल त्यांच्या नात्याबाबत खूपच जागरुक आहेत. त्यामुळे ते अद्याप याबद्दल जाहिरपणे बोलत नव्हते. मात्र आता त्यांचं नातं खुलत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच आथियाच्या वाढदिवसाला केएल राहुलनं तिच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये ज्या प्रकारे आथिया लाजत आहे आणि जसं राहुल तिच्याकडे पाहत आहे. त्यावरून तरी या दोघांमध्ये खूपच खास नातं असल्याचं दिसत आहे.
रणवीर सिंगला नागपूर पोलिसांच्या ‘या’ उत्तराने तुम्हीही माराल त्यांना कडक सॅल्युट
आथियाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला. हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
VIRAL VIDEO : भेटा या छोट्या दादी अम्माला, भूमि पेडणेकरनंही केलं कौतुक
VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी!
============================================================== अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







