नागपूर 6 नोव्हेंबर : पोलीस म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते. पोलिसांच्या वाट्याला फारसं कुणी जात नाही. सेन्स ऑफ ह्युमरचं तर पोलिसांना तसं वावडंच असतं. मात्र नागपूर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांमध्ये करड्या शिस्तीत काम करतानाही आपल्याला सेन्स ऑफ ह्युमर असल्याचं दाखवून दिलंय. नागपूर पोलीस ट्विटरवर कायम सक्रिय असतात. लोकांशी संवाद साधण्याचं ट्विटर हे चांगलं माध्यम असल्याने नागपूर पोलिसांच्या या कामाचं कौतुकही होतंय. बॉलिवूड स्टार रणवीर कपूरनं एक ट्विट करत Number या शब्दांची कोटी केली होती. त्याला नागपूर पोलिसांनी जे उत्तर दिलं ते पाहिलं तर तुम्हीही त्यांना कडक सॅल्युट करत नक्कीच दाद द्याल. 12 ते 14 तास ड्युटी, कायम गुन्हेगारांशी लढा यामुळे पोलिसांकडे फारशी विनोद बुद्धी नसते अशी टीका कायम केली जाते. मात्र वर्दीत राहुनही तुम्ही विनोद बुद्धी बाळगून जनजागृती करू शकता हे नागपूर पोलिसांनी दुसऱ्यांदा दाखवून दिलंय.
उद्या होणार शिवसेनेचा फैसला, उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक
अभिनेता रणवीर सिंगही आपल्या खास स्वभावामुळे ओळखला जातो. त्याने स्वत:चा एक स्टाईलबाज फोटो टाकत एक ट्विट केलं. ते ट्विट असं होतं. Whattis mobile number? Whattis your smile number? Whattis your style number? करूँ क्या dial number? आता या ट्विटला नागपूर पोलिसांनी काय उत्तर दिलं असेल अशी तुम्हाला उत्सुकता असेल त्यांनी फक्त 100 हा नंबर टाकत फोनचा सिम्बॉल टाकत रणवीरला त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 100 नंबर हा पोलिसांचा खास नंबर असून कुठल्याही अडचणीच्या काळात तो नंबर तुम्ही डायल करून पोलिसांची मदत मिळवू शकता. हा नंबर जास्तित जास्त लोकांपर्यंत जावा म्हणून कायम जनजागृती केली जाते. या आधीही नागपूर पोलिसांनी लँडर विक्रमचा जेव्हा इस्रो शोध घेत होतं तेव्हाही एक ट्विट करत लोकांची मनं जिंकली होती.
महाराष्ट्रात भाजपची सत्ता नकोच, काँग्रेसचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला
नागपूर पोलिसांचं विक्रमला आवाहन 7 सप्टेंबरला सर्व देशाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण थोडक्यात ‘लँडर विक्रम’ने हुलकावणी दिली. ISRO च्या प्रयत्नांना यश आलं आणि ‘लँडर विक्रम’ सुखरुप असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पुढेचे 12 दिवस विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्रो प्रयत्न करणार होतं. आता या गोष्टींचा आणि नागपूर पोलिसांचा काय संबंध असा प्रश्न तुम्ही नक्कीच विचाराल. पण कायम गुन्ह्यांसंबंधी ट्विट करणाऱ्या नागपूर पोलिसांच्या कल्पकतेला खरच दाद दिली पाहिजे. नागपूर पोलिसांनी यासंबंधी केलेलं एक ट्विट व्हायरल झालं असून सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. कंट्रोलरुममधून दिल्या जाणाऱ्या सिग्नल प्रतिसाद न देता शेवटच्या क्षणी ‘लँडर विक्रम’ भरकटला होता. त्यामुळे त्याचा कल्पकतेनं वापर करत नागपूर पोलिसांनी ‘लँडर विक्रम’ला कळकळीचं आवाहन केलंय. त्यात म्हटलं आहे की, प्रिय विक्रम, तु तातडीने प्रतिसाद दे. तु सिग्नल तोडल्यामुळे आम्ही तुला कुठलाही दंड करणार नाही. कायम दहशत आणि धाक वाटणाऱ्या पोलिसांच्या या कृतीमुळे वाचणाऱ्या प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर हसू येईल अशी प्रतिक्रिया एकाने ट्विटरवर व्यक्त केलीय. 12 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ते ट्विट Retweet केलंय तर 45 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ते Like केलंय.
सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते CMना भेटले, उद्धव ठाकरेंना देणार मानाचं पान
वाहतुकीच्या नियमांची आणि ते मोडले तर होणाऱ्या दंडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. त्यामुळे नियम न मोडता गाडी चालवा नाहीतर जो दंड बसेल त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होईल असे नवे नियम आहेत. हे ट्विट करताना तोही संदर्भ इंथं जोडण्यात येतोय. पण काहीही असो. नागपूर पोलिसांच्या या ट्विटला दाद दिलीच पाहिजे. नागपूर पोलिसांच्या धाकामुळे का होईल ‘लँडर विक्रम’ने प्रतिसाद द्यावं अशी प्रार्थनाही अनेकांनी होती.

)







