मुंबई, 06 नोव्हेंबर : भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सांड की आँख’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. सिनेमात दोन आजींची गोष्ट दाखवण्यात आली आहेत, ज्या उत्कृष्ट नेमबाजी करतात. त्या अशा गावात राहत असतात जिथे आजही महिलांना डोक्यावरून पदर सरकवण्याची परवानगी नाही. पण या सर्व गोष्टींवर मात करून त्या नेमबाजी करतात आणि सांड की आंखवर चोख निशाणा लावतात. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली मात्र त्याची क्रेझ अद्याप दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगी या सिनेमातील डायलॉग म्हणताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्राची नावाच्या एका मुलीनं ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यात ती सांड की आँख सिनेमातील ‘रे डाक्टर मन्ने तो अर्जुन की तरह चिडीयाँ की आँख ना दिखे, मन्ने तो सांड की आँख दिखे’ हा डायलॉग अभिनयासह बोलताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ भूमिनं रिट्वीट करत तिचं कौतुक केलं आहे. तिनं लिहिलं, ‘सो क्यूट. धन्यवाद छोटी दादी अम्मा’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. VIDEO : …आणि ‘ती’ रणवीर सिंहला म्हणाली, ‘भाभी मत कहना प्लीज’
This is so cute ❤️ thank you chotti so dadi amma #SaandKiAankh https://t.co/bUi1Xt2plD
— bhumi pednekar (@bhumipednekar) November 5, 2019
सांड की आँख या सिनेमाची कथा चंद्रो आमि प्रकाशी तोमर या आजीच्या संघर्षावर आधारित आहे. या सिनेमात भूमीने 87 वर्षीय चंद्रो तोमरची तर तापसीने 82 वर्षीय प्रकाशी तोमरची व्यक्तिरेखा सिनेमात साकारली आहे. खऱ्या आयुष्यात चंद्रा आणि प्रकाशी तोमर यांनी वयाच्या 65 नंतर नेमबाजीनंतर 30 हून जास्त राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्या. सर्व संकटांचा सामना करत दोघींनी नेमबाजीत 352 पदकं जिंकली आहेत. शाहरुखच्या सिनेमातील आयटम साँगचं शूट करताना रक्तबंबाळ झाली अभिनेत्री! ‘अर्जुनला पैसे सांभाळता येत नाहीत’, मलायका अरोरानं व्यक्त केली नाराजी =================================================== पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

)







