VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी!

VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी!

जिंकलेल्या पैशांचं तुम्ही काय करणार आहात या प्रश्नावर या स्पर्धकानं दिलेल्या उत्तरानं सर्वांचीच मनं जिंकली.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहेत. या शोमध्ये फक्त प्रश्नच विचारले जात नाहीत तर स्पर्धक आणि अमिताभ बच्चन त्यांचे वेगवेगळे अनुभव सुद्धा शेअर करतात. नुकत्याच प्रसारित झालेल्या या शोच्या एपिसोडमध्ये राजस्थानहून आलेले पंकज माहेश्वरी हॉटसीटवर बसले होते. ते फक्त केबीसी खेळलेच नाही तर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी अमिताभ बच्चन यांनी पंकजना विचारलं, जिंकलेल्या पैशांचं तुम्ही काय करणार आहात त्यावर त्यांनी खूपच सुंदर उत्तर दिलं.

केबीसी 11 चा एक व्हिडीओ सोनी टीव्हीनं त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये पंकज माहेश्वरी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसले आहेत. बिग बी त्यांना विचारतात, जिंकलेल्या रकमेच तुम्ही काय करणार आहात. त्यावर पंकज सांगतात. माझे वडील चहाचं दुकान चालवतात. त्यामुळे मी जिंकलेली ही रक्कम ते दुकान मोठं करण्यासाठी वापरेन आणि त्यातूनही पैसे राहिले तर मी ते पैसे माझ्या मोठ्या बाबांना देईन. पंकजचं हे उत्तर ऐकून अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ऑडियन्सही खूश होतात आणि टाळ्या वाजवू लागतात.

शाहरुखच्या सिनेमातील आयटम साँगचं शूट करताना रक्तबंबाळ झाली अभिनेत्री!

पंकज माहेश्वरी यांनी केबीसीमध्ये 3 लाख 20 हजाराची रक्कम जिंकली. ज्यानंतर हूटर वाजला आणि त्यांना या खेळातून बाहेर पडावं लागलं.

पंकज यांना विचारण्यात आलेले इतर प्रश्न

प्रश्न : भारत दूरसंचारच्या संदर्भात STD आणि ISD मधील D काय आहे?

उत्तर : डायलिंग

प्रश्न : यातील कोणत्या खाद्यपदार्थाचं नाव राजस्थानशी जोडलेलं आहे.

उत्तर : दाल बाटी

प्रश्न : एका बालकथेनुसार उंच उड्या मारुनही द्राक्ष न मिळाल्यानं द्राक्षच आंबट असल्याचं म्हणतो?

उत्तर : कोल्हा

प्रश्न : महाभारतानुसार द्युत खेळासाठी दुर्योधनानं कोणाला आव्हान दिलं होतं?

उत्तर : युधिष्ठिर

‘अर्जुनला पैसे सांभाळता येत नाहीत’, मलायका अरोरानं व्यक्त केली नाराजी

प्रश्न : फोटोवरुन सांगा हा कोणत्या संस्थेचा युनिफॉर्म आहे?

उत्तर : नौसेना

प्रश्न : हे कोणत्या सुपर हिरोच्या सिनेमाचं गाणं आहे?

उत्तर : अ फ्लाइंग जाट

प्रश्न : बजाज ऑटोच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव काय आहे?

उत्तर : चेतक

प्रश्न : पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे ऑरबिटर पाठवणारा एकमेव देश कोणता?

उत्तर : भारत

प्रश्न : यातील कोणत्या कंपनीचं पहिलं उत्पादन सनफ्लॉवर वनस्पति होतं?

उत्तर : विप्रो

बालकलाकराला अपशब्द वापरल्यानं स्वरा भास्कर ट्रोल, पाहा VIRAL VIDEO

================================================================

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

First published: November 6, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading