Home /News /entertainment /

Suicide or Murder: सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर लवकरच मुव्ही, पोस्टर झळकलं

Suicide or Murder: सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर लवकरच मुव्ही, पोस्टर झळकलं

बॉलिवूडमधील घराणेशाही सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

  मुंबई, 19 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत यानं वयाच्या 34 व्या वर्षी जगाला अलविदा केलं. सुशांत यानं टोकाचं पाऊल उचलून अचानक एक्झिट घेतल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सुशांतने डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली, असं बोललं जात आहे. दुसरीकडे,  बॉलिवूडमधील घराणेशाही सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. हेही वाचा...सुशांतसारखाच आहे या तरुणाचा चेहरामोहरा, टिकटॉकवर VIDEO व्हायरल दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या जीवनवर आधारित मुव्ही (Sushant Sing Rajput Biopic) लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. फिल्म निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी ही घोषणा केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित मुव्हीचं टायटल निश्चित झालं आहे. 'Suicide or Murder'असं या सिनेमाचं असेल. विजय शेखर गुप्ता यांनी सिनेमाचं पोस्टर देखील रिलीज केलं आहे.
   
  View this post on Instagram
   

  A post shared by VIJAY SHEKHAR GUPTA (@iamvijayshekhar) on

  बॉलिबूडमध्ये सध्या बडे स्टार्स, प्रोडक्शन हाऊसची मोनोपॉली सुरू आहे. ही मोनोपॉली संपुष्ठात आणण्यासाठी हा सिनेमा बनवत असल्याचं विजय शेखर गुप्ता यांनी सांगितलं आहे. सुशांतसोबत जे काही घडलं ते सगळं या सिनेनात असेल. बड्या प्रोडक्शन हाऊसने सुशांतवर कसा बहिष्कार टाकला होता. त्याला सोशल बायकॉट केलं होतं, अनेक सिनेमातून त्याला बाजूला केलं होतं, हे सगळं सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हेही वाचा... सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही सिनेमा- विवेक विजय यांनी सांगितलं की, याबाबत टीम रिसर्च करत आहे. आणि सिनेमाच्या कथानकाचंही काम सुरू झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, या सिनेमात सुशांतच्या भूमिकेत नवा चेहरा दिसणार आहे. विजय यांनी नवा अभिनेता फायनल केला आहे. दुसऱ्या स्टारकास्टवर देखील काम सुरू आहे.
  First published:

  Tags: Bollywood actor, Bollywood news, Sushant sing rajput, Sushant Singh Rajpoot, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या