Home /News /entertainment /

'सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही चित्रपट', दिग्दर्शकाचा दावा

'सुशांतला 'हेट स्टोरी'साठी साइन केलं होतं पण बालाजीने करू दिला नाही चित्रपट', दिग्दर्शकाचा दावा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihottri)याने त्याच्या ट्विटर हँडरवरून एक डूडल शेअर करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे

    मुंबई, 19 जून : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) जाण्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. सोशल मीडियावरून अनेकजण त्याच्या आठवणी शेअर करत आहेत तसंच त्याला श्रद्धांजली देखील वाहत आहेत. चाहत्यांसाठी देखील सुशांतचे असे अचानक जाणे एक प्रकारे धक्काच होता. या सगळ्यामध्ये सोशल मीडियावर नेपोटिझम (Nepotism), स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांकडे होणारं दुर्लक्ष यावर चाहत्यांकडून चर्चा केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihottri)यांने देखील त्याच्या ट्विटर हँडरवरून एक डूडल शेअर करत सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावर एका ट्विटर यूजरने अशी कमेंट केली आहे की, 'तो जेव्हा जिवंत होता, त्यावेळी काही चित्रपटा्ंची त्याला ऑफर देऊ शकला असता'. (हे वाचा-'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत मित्र महेश शेट्टीची भावुक पोस्ट) ट्विटर यूजरच्या त्या कमेंटवर विवेक अग्निहोत्री यांनी रिप्लाय देखील दिला आहे. त्यांनी या कमेंटमध्ये असा दावा केला आहे की, 'मी हेट स्टोरीसाठी त्याला साइन केलं होतं, मात्र त्यावेळी बालाजी ने त्याला हा चित्रपट करू दिला नाही'. सुशांत एकता कपूरच्या (Ekta Kapoor) 'पवित्र रिश्ता'मधून घराघरात पोहोचलेला चेहरा होता. बालाजी टेलिफिल्म्सने त्याला त्याचा पहिला ब्रेक दिला होता. यामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) त्याची सहकलाकार होती. 2012 मध्ये जरी त्याला 'हेट स्टोरी'मधून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला नाही तरी पुढच्या वर्षीच त्याची 'काय पो चे' प्रदर्शित झाली. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वकिलाने दाखल केली या कलाकारांविरोधात खटला एका वकिलाने बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांविरोधात खटला दाखल केला आहे. या वकिलाने एकता कपूर, सलमान खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि अन्य काही जणांविरोधात खटला दाखल केला आहे. या वकिलाने असा आरोप केला आहे की, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी या कलाकाराविरोधात कट रचला आणि त्याला स्वत:चा जीव घेण्यास प्रवृत्त केले. ...मी त्याला लाँच केलं होतं- एकता 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्यानंतर चित्रपट आणि मालिका सृष्टी सुन्न झाली होती. 'पवित्र रिश्ता' पासून सुरु झालेला प्रवास बॉलिवूडकडे वळला होता. सुशांतने 'काय पो चे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'पीके', 'राबता', 'केदारनाथ', 'सोनचिडिया' या चित्रपटात काम केले आहे. त्याने साकारलेला धोनी सर्वांच्या स्मरणात राहील. एकता कपूरविरोधात केस दाखल झाल्यानंतर तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'सुशी ला कास्ट न कऱण्याबाबत केस दाखल करण्यासाठी धन्यवाद... जेव्हा खरंतर मी त्याला लाँच केलं होतं.'
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या