Home /News /entertainment /

सुशांतसारखाच आहे या तरुणाचा चेहरामोहरा, टिकटॉकवर VIDEO व्हायरल

सुशांतसारखाच आहे या तरुणाचा चेहरामोहरा, टिकटॉकवर VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर एक टिकटॉक व्हिडीओ खूप व्हायरल (Viral TikTok Video) होत आहे. या व्हिडीओतील तरूण सुशांतचा 'हमशकल' (सुशांत सारखाच दिसणारा) असल्याचं लोकं म्हणत आहे.

    मुंबई, 19 जून : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ची आत्महत्या बॉलिवूडकरांना आणि त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. त्याचे कुटुंबीय आणि मित्रवर्ग देखील अद्याप या धक्क्यातून सावरले नाही आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून सोशल मीडियावर सुशांतचे अनेक व्हिडीओ, जुने फोटो व्हायरल होत आहे. अनेक जण सोशल मीडियावर त्याच्याबद्दल बोलत आहेत. काही ठिकाणी नेपोटिझम (Nepotism) या विषयावर टीका केली जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक टिकटॉक व्हिडीओ खूप व्हायरल (Viral TikTok Video) होत आहे. या व्हिडीओतील तरूण सुशांतचा 'हमशकल' (सुशांत सारखाच दिसणारा) असल्याचं लोकं म्हणत आहे. सुशांत सारख्या दिसणाऱ्या या तरुणाचं नाव सॅकी पांड्या (Saqqy Pandya) असे आहे. या टिकटॉक यूजरचा चेहरा अनेकांना काही प्रमाणात सुशांत सिंह राजपूत सारखाच भासत आहे. सॅकीने सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहण्यासाठी एक टिकटॉक व्हिडीओ देखील बनवला आहे, ज्यामध्ये तो काही अंशी सुशांत देखील वाटत आहे. (हे वाचा-'सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या', आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा) अगदी त्याच्यासारखाच तो चालत देखील आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅप्शन देखील दिली आहे. सुशांतला तो आदर्श मानत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
    सॅकीचा हा व्हिडीओ 7.1 मिलियन वेळा पाहण्यात आला आहे तर 3 लाखांपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. अनेकांनी यावर कमेंट्स केल्या असून काहींनी त्याला बॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या