मुंबई, 10 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने कहाणी, जलसा तसेच डर्टी पिक्चर या चित्रपटाद्वारे ती कोणत्याही भूमिकेत सहज मिसळून जाण्याची ताकद तिने दाखवून दिली आहे. बॉलीवूडमध्ये वेळोवेळी अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. या यादीत आता विद्या बालनचा देखील समावेश झाला आहे. विद्या बालन स्वतःला भाग्यवान समजते की तिला कधीच या गोष्टीचा सामना करावा लागला नाही, परंतु विद्याने तिला एकदा अशा प्रकारच्या अनुभवातून जावे लागले होते असं सांगितलं. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्रीनं याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
या मुलाखतीत त्याविषयी सांगताना विद्या बालन म्हणाली कि, मी खूप भाग्यवान आहे की माझ्यासोबत कास्टिंग काउचसारखी घटना घडली नाही. मी अनेकांचे धक्कादायक अनुभव ऐकले आहेत. मी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी याचीच माझ्या आई-वडिलांना सर्वात मोठी भीती होती. अशाच प्रकारचा अनुभव विद्या बालनला आला होता.
याविषयी सांगताना विद्या म्हणाली कि, 'मला माझ्यासोबत घडलेली एक घटना आठवते. मी एक चित्रपट साइन केला होता. एका जाहिरात चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी चेन्नईला गेलो होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मीटिंगसाठी बोलावले होते, मी चित्रपटाला हो म्हणाले होते, म्हणून मी दिग्दर्शकाला भेटायला गेले. आम्ही कॉफी शॉपवर भेटलो, पण त्याने खोलीत जाण्याचा आग्रह धरला.'
View this post on Instagram
पुढे विद्या म्हणाली, 'पण योग्य वेळी माझी 'फिमेल इंस्टिंक्ट’ जागृत झाली आणि त्याच्या खोलीत गेल्यावर मी खोलीचा दरवाजा उघडा ठेवला. त्याला हे देखील समजले होते की माझ्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे मी कास्टिंग काउचमधून सुटले.' अशा प्रकारे तिने स्वतःला कास्टिंग काउचचा बळी होण्यापासून वाचवले. मात्र, यानंतर तिला चित्रपट गमवावा लागला. विद्या म्हणाली 'चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझ्या आई-वडिलांची हीच सर्वात मोठी भीती होती. यामुळे माझे आई-वडील माझ्या चित्रपटात करिअरविषयी खूश नव्हते.' असा खुलासा यावेळी अभिनेत्रीनं केला आहे.
तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होत असताना विद्याने तिच्या करिअरचा चेहराही सांगितला. यामुळे मला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आले. विद्या बालन शेवटची शेफाली शाहसोबत 'जलसा'मध्ये दिसली होती. विद्या बालन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सध्या तिचे विनोदी रिल्स नेहमी व्हायरल होत असतात. आता तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Vidya Balan