मुंबई, 29 जानेवारी : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल जी भूमिका करतो त्यात जीव ओततो. त्याने आजवर अतिशय मोजक्याच भूमिका निभावल्या असल्या तरी त्या कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. विकी कौशलने आपल्या अभिनय कारकिर्दीत असे अनेक चित्रपट केले आहेत, जे सुपरहिट ठरले आहेत. आता विकीच्या नावाने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतात. पण जेव्हा विकीने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली, तेव्हा त्याला कोणीही ओळखत नव्हते. या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. पण या चित्रपटात विकीनेही भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने त्याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर' या गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विकीला अटक झाली होती. असा खुलासा केला आहे. अनुराग कश्यप जेव्हा कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता तेव्हा त्याने हा खुलासा केला. याच चित्रपटाचा अभिनेता पियुष मिश्रा म्हणतो की, जोपर्यंत अनुरागच्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटींगवर कोणाला अटक होत नाही तोपर्यंत कोणत्याही चित्रपटाचे शूटींग चालू आहे असे वाटत नाही. दरम्यान, अनुरागने 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या शूटिंगचाही उल्लेख केला आणि सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकी कौशलला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा - Vicky Kaushal: क्या बात! विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'गँग्स ऑफ वासेपूर'च्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कपिल शर्माने नुकतेच त्याच्या शोमध्ये चित्रपटाच्या टीमला आमंत्रित केले होते. यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यपसह अभिनेता मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशी आणि पियुष मिश्रा देखील सेटवर उपस्थित होते. या खास प्रसंगी अभिनेता पियुषने अनुरागच्या फिल्म मेकिंग स्टाइलचाही उल्लेख केला. यादरम्यान अनुरागने विकी कौशलला चित्रपटाच्या सेटवर अटक झाल्याचा खुलासाही केला.
View this post on Instagram
दिग्दर्शकाने सांगितले की 'गँग्स ऑफ वासेपूर' मधील सर्वात खास गोष्टींपैकी एक म्हणजे बेकायदेशीर खाणकामाची कच्ची दृश्ये, जी पूर्णपणे वास्तविक आहेत. चित्रपटात अवैध वाळू उत्खननाचे दृश्य, स्थानिक माफिया तेथे अवैध वाळू उत्खनन करत होते आणि आम्ही कॅमेरा घेऊन तिथे पोहोचलो होतो. अशा परिस्थितीत विकी कौशल आणि युनिटच्या एका सदस्याला अटक करण्यात आली.
अभिनेता पियुष मिश्राने सांगितले की, प्रत्येक वेळी त्याला असे वाटते की तो अनुरागसोबत पुन्हा काम करणार नाही. पण पुढच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टची खासियत पाहून ते पुन्हा राजी होतात. पियुषने याचे कारण सांगितले की, अनुरागची फिल्म मेकिंग स्टाइल खूपच जबरदस्त आहे. तो स्पष्ट करतो की अनुरागच्या चित्रपटात कोणतीही गोष्ट आधीच ठरलेली नाही, मग ती स्क्रिप्ट असो किंवा सीन. यासोबतच पियुषने असेही सांगितले की, अनुरागच्या चित्रपटांच्या शूटिंगवर पोलिस येणे खूप सामान्य गोष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Vicky kaushal