रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

Sam Manekshaw Biopic : मेघना गुलजार यांनी आज 27 जुलैला मानेकशॉ यांच्या पुण्यातिथीचं निमित्तानं या बायोपिकची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 12:21 PM IST

रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

मुंबई, 27 जून : बॉलिवूडमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून सॅम मानेकशॉ यांच्यावर बायोपिकच्या निर्मितीची चर्चा होती. मात्र यावर आता पूर्णविराम लागला आहे. प्रसिद्धा दिग्दर्शिका मेघना गुलजार मानेकशॉ यांच्यावर बायोपिक बनवणार असून नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुकही शेअर करण्यात आला आहे. सुरुवातीला या सिनेमासाठी अभिनेता रणवीर सिंहच्या नावाची चर्चा होती मात्र आता या सिनेमासाठी अभिनेता विकी कौशलचं नाव फायनल करण्यात आलं आहे. सध्या या मानेकशॉ यांच्या भूमिकेती विकी कौशलची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट

मानेकशॉ यांच्या बायोपिकमधील विकीचा फर्स्ट लुक दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी ट्विटरवरून शेअर केला. विकीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या फोटोमध्ये मानेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल ओळखताही येत नाही.

या सिनेमाची निर्मीती रोनी स्क्रुवाला करणार असून राजी फेम भवानी अय्यर आणि बधाई हो फेम शांतनु श्रीवास्तव या सिनेमासाठी लेखन करणार आहेत. मेघना गुलजार व्यतिरिक्त विकी कौशलनंही हा फर्स्टलुक त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानं लिहिलं, ‘मानेकशॉ यांच्यासारख्या भारतीय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळल्यामुळे मला स्वतःला अभिमान वाटतो. मानेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या बायोपिकचा फर्स्ट लुक शेअर करत आहे.’

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला मातृशोक, आई विजया निर्मला यांचं निधन

सॅम मानेकशॉ हे 1971मध्ये भारत-पाक युद्धा दरम्यान भारतीय सेनेच्या आर्मी स्टाफचे चीफ होते. त्यानंतर त्यांना फिल्ड मार्शल पदी बढती देण्यात आली. ते भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. सध्या बॉलिवूडमध्ये आर्मी आणि देशभक्ती हा विषय ट्रेंडिग आहे. त्यामुळे हा सिनेम केवळ बायोपिक नसून मानेकशॉ यांचा संपूर्ण जीवनप्रवास असेल असं म्हटलं जात आहे. मेघना गुलजार यांनी आज 27 जुलैला मानेकशॉ यांच्या पुण्यातिथीचं निमित्तानं या बायोपिकची घोषणा केली आहे.

'या' प्रसिद्ध मराठमोळ्या लेखिकेने घेतला 'कबीर सिंग' न पाहण्याचा निर्णय

====================================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...