दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला मातृशोक, आई विजया निर्मला यांचं निधन

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला मातृशोक, आई विजया निर्मला यांचं निधन

Nirmala Vijaya Death : निर्मला विजया या दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

  • Share this:

मुंबई, 27 जून : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची सावत्र आई आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका विजया निर्मला यांचं वयाच्या 73 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. गुरूवारी गाचीबोउली, हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालायात विजया यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबूचे वडील कृष्णा यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. दाक्षिणात्य सिने सृष्टीतील विजया निर्मला प्रसिद्ध व्यक्ती होत्या. 2002मध्ये सर्वांधिक सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांच्या नावाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती.

अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट

तेलुगू सिनेमामध्ये विजया यांचं खूप मोठं योगदान आहे. 2008मध्ये त्यांना तेलुगू सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी रघुपती वेंकय्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्या दाक्षिणात्य सिने सृष्टीतील त्या दोन महिलांपैकी एक आहेत ज्यांनी साउथ सुपरस्टार शिवाजी गणेशन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं.

विजया निर्मला यांनी त्याच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केलं. महेश बाबूचे वडील अभिनेता कृष्णा यांच्याशी त्यांची दुसरा विवाह होता. कृष्णा यांच्यासोबत त्यांनी तब्बल 47 सिनेमांमध्ये काम केलं होतं आणि त्यांच्या संपूर्ण सिने करिअरमध्ये विजया यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलं. महेश बाबू व्यतिरिक्त त्यांचा दुसरा मुलगा नरेश सुद्धा अभिनय क्षेत्रात आहे. विजया यांनी एकही हिंदी सिनेमात काम केलेलं नाही मात्र त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम सिनेमा, टीव्ही आणि थिएटरमध्ये काम केलं आहे.

संसदेत मोदींनी ऐकवला शेर, तर अख्तरांनी दिला ‘हा’ खास सल्ला

विजया काही काळासाठी एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्म जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी त्यांची पहिली टीव्ही मालिका ‘पेल्ली कनुका’ बालाजी टेलीफिल्मच्या बॅनरखाली सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाउस सुरू केलं. ज्याअंतर्गत त्यांनी जवळपास 15 सिनेमांची निर्मिती केली.

बाहुबलीच्या 'देवसेने'चा झाला अपघात, थोडक्यात बचावला पाय

===========================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 27, 2019, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading