'या' प्रसिद्ध मराठमोळ्या लेखिकेने घेतला 'कबीर सिंग' न पाहण्याचा निर्णय |Shobha De| Shahid Kapoor| Kabir singh

'या' प्रसिद्ध मराठमोळ्या लेखिकेने घेतला 'कबीर सिंग' न पाहण्याचा निर्णय |Shobha De| Shahid Kapoor| Kabir singh

Shobha De| Shahid Kapoor| Kabir singh संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला मागे टाकत या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला गाठला आहे.

  • Share this:

मुंबई, जून 26 : शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा अधिकृत रिमेक असला तरी प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर दुसरीकडे मात्र चित्रपटावर टीकेची झोड उठवली जातेय. 21 जूनला प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला मागे टाकत या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला गाठला आहे. याशिवाय शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या अभिनयाचं कौतुकही होतंय. असं असलं तरी, या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.

कबीर सिंगमध्ये चाकूची भीती दाखवत मुलीला कपडे उतरवायला सांगतात असा एक सीन दाखविण्यात आला आहे. नेमकी याच दृश्यावर समीक्षकांसह प्रेक्षकांनाही आक्षेप घेतला आहे. यात आणखी भर पडली ती शोभा डे यांच्या ट्वीटने. आपलं मत परखड आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या लेखिका आणि पत्रकार शोभा डे यांनी चित्रपटाविरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी कबीर सिंग चित्रपट पाहण्यासाठी विरोध दर्शवला आहे. याबद्दल ट्वीट करताना त्या म्हणाल्या की, 'मी शाहिदची खूप मोठी फॅन आहे पण, कबीर सिंग हा चित्रपट पाहण्यासाठी नकार देते.'स्टॉकिंग' हा गुन्हा आहे. त्याला कोणत्याही प्रकारे सहन केले जाणार नाही.'

#Metoo: नाना पाटेकरांना दबावाखाली क्लीन चिट? पण नंतर तनुश्री फिरकलीच नाही!मुंबईच्या डॉक्टरची तक्रार

कबीर सिंग चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईच्या डॉ. प्रदीप घाटे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे प्रर्दशन थांबवावे असेही तक्रारीमध्ये सांगितले आहे. सिनेमात शाहिदने एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारली आहे. यात तो अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसतो. चित्रपटातून डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा दावा त्यांनी या तक्रार केला आहे.

तुषार कपूरसोबत भांडण झाल्यावर एकताने बोलावले पोलिसांना

ब्लॉगबस्टर सिनेमा

सिनेमासाठी इतका विरोध होत असला तरी, हा चित्रपट शाहिदच्या फिल्मी करिअरमधला सर्वात मोठा ठरू शकतो. 21 जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. एवढचं नाही तर, या सिनेमाने शाहिदचा मागील सिनेमा 'पद्मावत'लाही मागे टाकलं आहे. अरजित सिंगच्या आवाजातलं 'बेखयाली’ हे गाणं सुपरहिट झालं असून यूट्यूबवर खूप पसंत केलं जात आहे.

VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...

First published: June 26, 2019, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading