अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट Sushmita Sen | Rohman Showl | Sushmita-Rohaman Breakup

अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट Sushmita Sen | Rohman Showl | Sushmita-Rohaman Breakup

Sushmita Sen Breakup : मागच्या काही दिवसांपासून आपल्या रिलेशिपमुळे चर्चेत असणारी सुश्मिता सेन पुन्हा एकदा सिंगल झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन मागच्या काही दिवसांपासून स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान मुलाला डेट करत असल्यानं खूप चर्चेत आहे. या दोघांचेही फोटो नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता या दोघांचंही ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुश्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं लक्षात येत आहे. तसेच सुश्मितानंही रोहमनला सोशल मीडियावर फॉलो करणं बंद केलं आहे. त्यामुळे सुश्मिता आणि रोहमन सध्या वेगळे झाल्याचं बोललं जात आहे.

टायगरची गर्लफ्रेंड शोभते, दिशा पाटनीचा वर्कआउटचा भन्नाट VIDEO पाहिलात का?

रोहमन शॉलनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर रोहमननं एका मागोमाग एक 4 पोस्ट केल्या, पहिल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ‘हे यू, मी तुझ्याशी बोलत आहे. असं काय आहे ज्याचा तुला त्रास होत आहे. कृपया मला सांग मी तुझं सर्वकाही मन लावून ऐकत आहे. 24 तास.’

तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये रोहमनं म्हणतो, ‘तुम्हाला वाटतं की, हे नातं पुढे नेण्यासाठी तुम्ही खूप काही करत आहात आणि तुमचा जोडीदार काहीच करत नाही. ठीक आहे. तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की, तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी जे काही करत आहात तो तुमचा निर्णय आहे. तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्ही तशाच वागणूकीची अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करा ज्या खरंच तुम्हाला कराव्याशा वाटतात. त्यानेही आपल्याशी तसंच वागावं यासाठी काहीही करु नका ’

VIDEO: रितेश देशमुखने सांगितलं त्याच्या सुखी संसाराचं रहस्य

रोहमननं पुढे लिहीलं, ‘तुम्हाला वाटतं की, तुमच्या जोडीदारानं तुम्हालाही तशीच वागणूक द्यावी जशी तुम्ही त्याला देता, कारण तुम्ही त्या नात्यात आहात. पण जर कोणी तुमच्यासोबत चांगलं वागत नाही आणि तरीही तुम्ही त्याच्यासोबत आहात तर मग ही तुमची चूक आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करायला शिका.’

VIDEO: असं काय झालं की सिद्धार्थ जाधव सईला म्हणाला, ‘तुम तो धोकेबाज हो’

आपल्या चौथ्या पोस्टमध्येही रोहमन भावूक झालेला दिसला, त्यानं लिहिलं,तुम्ही कधी एकटे राहून कंटाळता? ठीक आहे. तुम्ही अशी आशा का करता की तुमचा जोडीदार तुम्हाला इंटरेस्टिंग समजेल जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेऊ शकत नाही. रोज टीव्ही, फोन, पुस्तकं याच्या शिवाय 15-20 मिनिटं स्वतःसोबत घालवा. स्वतःचा आवाज ऐका जो तुमच्याशी बोलू इच्छित आहे. यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला सुरुवात होईल.

काही दिवसांपूर्वी राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सुश्मितानं, ती रोहमनला एक चाहता म्हणून सोशल मीडियावर भेटल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रोहमननं तिला फुटबॉल मॅचसाठी बोलवलं आणि अशा रितीनं त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.

याला म्हणतात दम! रजनीकांतचा फोटो हटवल्यामुळे BIGG BOSS अडचणीत

=================================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

First published: June 27, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading