Home /News /entertainment /

विकी कौशल अनेकदा झाला आहे स्लीप पॅरालिसिसची शिकार, शेअर केला आजाराचा धक्कादायक अनुभव

विकी कौशल अनेकदा झाला आहे स्लीप पॅरालिसिसची शिकार, शेअर केला आजाराचा धक्कादायक अनुभव

विकीनं पहिल्यांदाच आपण बऱ्याच वेळा स्लीप पॅरालिसिसची शिकार झाल्याचा खुलासा केला.

  मुंबई, 23 एप्रिल : 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमातील आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता विकी कौशल आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. पण फार कमी काळातच बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा विकी मागच्या बऱ्याच काळापासून एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. नुकत्याच सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना विकीनं पहिल्यांदाच आपण बऱ्याच वेळा स्लीप पॅरालिसिसची शिकार झाल्याचा खुलासा केला. विकी कौशलला स्लीप पॅरालिसिस ही एक सर्वात भीतीदायक गोष्ट वाटते. विकीनं अलिकडेच चाहत्यांशी चॅट सेशन ठेवलं होतं. यावेळी एका चाहत्यानं त्याला तू वास्तवात कधी भूत पाहिलं आहे का असा प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर देताना त्यानं त्याच्या या गंभीर समस्येचा खुलासा केला. संजय दत्तची पहिली पत्नी दिसायची एवढी सुंदर, मुलगी त्रिशालानं शेअर केला Photo
  View this post on Instagram

  Facing fear, head on! #Bhoot #21stFeb2020

  A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

  विकीनं चाहत्याला उत्तर देताना लिहिलं, 'मी अनेकादा स्लीप पॅरालिसिसची शिकार झालो आहे. हा खूप भीतीदायक अनुभव आहे. ही एक अशी समस्या आहे. जेव्हा व्यक्ती अचानक झोपेतून जागी होते आणि त्यावेळी त्याला चालताना, बोलताना किंवा कोणतीही क्रिया करताना बऱ्याच काळासाठी समस्या येते.' सलमान खानकडून राष्ट्रवादी नेत्याच्या फिटनेसचं कौतुक, VIDEO पाहून व्हाल थक्क यावेळी विकीनं हे सुद्धा स्पष्ट केलं की त्याला हॉरर सिनेमा पाहण्याची खूप भीती वाटते. इन्स्टाग्राम ओपन चॅटमध्ये त्याला एका चाहत्यानं तुला भूतांची भीती वाटते का असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना विकी म्हणाला, हॉरर सिनेमा किंवा गोष्टींबद्दल बोलायचं तर मी जगातला सर्वात भित्रा व्यक्ती आहे.
  विकीच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला की, कधी घाबरुन वॉशरूममधून दुऱ्या रूमध्ये पळत गेला आहेस. यावर विकी म्हणाला हो असं खूप वेळा झालं आहे. योगायोग म्हणजे काही दिवसांपूर्वी विकीनं पहिल्यांदाच 'भूत पार्ट-1 : द हॉन्टेड शिप' या हॉरर सिनेमात काम केलं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. रोज पायी प्रवास... 30 रुपये पगार... रोहित शेट्टीच्या करिअरची अनटोल्ड स्टोरी
  विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच शूजीत सरकारच्या 'सरदार उधम सिंह' या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे मेघना गुलजार यांचा 'मार्शल सॅम मानेकशॉ' हा बायोपिक सुद्धा आहे. या दोन्ही सिनेमात तो प्रमुख भूमिका साकारत आहे. (संपादन : मेघा जेठे.)
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Vicky kaushal

  पुढील बातम्या