Home /News /entertainment /

संजय दत्तची पहिली पत्नी दिसायची एवढी सुंदर, मुलगी त्रिशालानं शेअर केला Photo

संजय दत्तची पहिली पत्नी दिसायची एवढी सुंदर, मुलगी त्रिशालानं शेअर केला Photo

त्रिशालानं नुकताच आई रिचाचा फोटो शेअर केला आणि या फोटोवर संजय दत्तची बहीण आणि पत्नी मान्यता दत्तनं सुद्धा कमेंट केली आहे.

  मुंबई, 23 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. मात्र तरीह ती लाइम लाइटपासून दूर असते. त्रिशालाचे फॉलोअर्स सुद्धा एखाद्या सिनेस्टार पेक्षा कमी नाहीत. तिनं कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला की तो लगेचच सगळीकडे व्हायरल होतो. अलिकडेच त्रिशालानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो आहे संजय दत्तची पहिली पत्नी आणि त्रिशालाची आई रिचा शर्मा हिचा. या फोटोमध्ये रिचा शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोवर संजय दत्तची बहीण आणि पत्नी मान्यता दत्तनं सुद्धा कमेंट केली आहे. त्रिशाला दत्त त्या स्टार किड्स पैकी आहे जे बॉलिवूड आणि लाइमलाइट पासून दूर राहणं पसंत करतात. त्यामुळे त्रिशालानं तिचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा प्रायव्हेट ठेवलं आहे. मात्र तिनं शेअर केलेल्या रिचा शर्माच्या फोटोचा स्क्रिनशॉट सगळीकडे व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आणि बहीण प्रिया दत्त यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. आई रिचाचा फोटो शेअर करताना त्रिशालानं लिहिलं, मी आणि आई...1988 #RIPMommy रोज पायी प्रवास... 30 रुपये पगार... रोहित शेट्टीच्या करिअरची अनटोल्ड स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रिचानं आपल्या तान्हुल्या त्रिशालाला कुशीत घेतलेलं दिसत आहे. या फोटोमध्ये हसतमुख रिचा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर कमेंट करताना मान्यता दत्तनं लिहिलं, 'सुंदर' तर प्रिया दत्तनं लिहिलं, 'किती सुंदर, त्रिश आता ती स्वर्गातील एक एंजल आहे. जी नेहमी तुला पाहते. ती या जगात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. देव तिच्या आत्माला शांती देवो.' सुनिधी चौहानचा 8 वर्षांचा संसार मोडला? नवरा म्हणतो, 'आम्ही दोघंही...'
  रिचा शर्माचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ही पहिली वेळ नाही की त्रिशालानं तिच्या आईचा फोटो शेअर करुन तिची आठवण काढली आहे. आधीही तिनं अनेकदा आपल्या आईचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिचा शर्मा आणि 1987 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनतर रिचाला कॅन्सरचं निदान झालं आणि त्यातच तिचं निधन झालं. (संपादन : मेघा जेठे.) मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं केली होती आत्महत्या
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sanjay dutt

  पुढील बातम्या