रोज पायी प्रवास... 30 रुपये पगार... रोहित शेट्टीच्या करिअरची अनटोल्ड स्टोरी

रोज पायी प्रवास... 30 रुपये पगार... रोहित शेट्टीच्या करिअरची अनटोल्ड स्टोरी

वडिलांच्या निधनानंतर फार कमी वयातच रोहितवर कुटुंबाचा भार आला आणि त्यानं वयाच्या 15 वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : एखादं काम मानापासून आणि विश्वासानं कराल तर नक्कीच पूर्ण होतं असं म्हटलं जातं. बॉलिवू़डमध्ये अशी कित्येक नावं आहेत. ज्यांनी आपल्या कामाच्या कष्टांच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे. कलाकारांच्या स्ट्रगल स्टोरीज तर सर्वांनाच माहित आहे. मात्र बॉलिवूडमध्ये असा एक दिग्दर्शक आहे. ज्यानं बॉलिवूडला आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहे. हा दिग्दर्शक आहे रोहित शेट्टी.

सध्याच्या परिस्थिती कोरोना ग्रस्तांसाठी अहोरात्र मेहनत करत असलेल्या मुंबई पोलिसांसाठी मुंबईतल्या 8 नामांकित हॉटेल्समध्ये जेवण आणि नाश्त्याची सोय केल्यानंतर रोहित पुन्हा एकदा चर्चेत आला. आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहितनं वयाच्या 15 वर्षांपासून या इंड्स्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र त्याची स्ट्रगल स्टोरी फार कमी लोकांना माहित आहे.

मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं केली होती आत्महत्या

30 रुपये पगाराची नोकरी

रोहित जेव्हा चौथी-पाचवीत होता त्यावेळी त्याचे वडील एमबी शेट्टी यांचं निधन झालं. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक तंगी भासू लागली. ज्या घरासमोर एकेकाळी 4 मोठ्या-मोठ्या गाड्या होत्या त्या एक-एक करुन विकल्या गेल्या. त्यामुळे फार कमी वयातच रोहितवर कुटुंबाचा भार आला आणि त्यानं वयाच्या 15 वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली. ज्या कामाच्या मोबदल्यात त्याला 30 रुपये मिळत होते आणि त्यातून त्याला गुजराण करावी लागत होती.

 

View this post on Instagram

 

Fear has a new definition #khatronkekhiladi

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

कुकू कोहलीनं दिलं पहिलं काम

रोहित शेट्टीला पहिलं काम कुकू कोहली यांच्याकडून मिळालं. त्यांनी पहिल्यांदा रोहितला इंटर्नचा जॉब दिला. रोहितला घरी आर्थिक मदत करायची होती मात्र त्या काळात इंटर्नला केवळ प्रवास भाडं दिलं जात असे. ज्याचे रोहितला केवळ 30 रुपये मिळत असत आणि तो ही सॅलरी सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत असे. तो घरी येता -जाता पायी प्रवास करत असे. कुकू ज्या सिनेमासाठी काम करत होते तो सिनेमा होता फूल और कांटे. ज्यातून वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगणला लॉन्च केलं जात होतं.

Lokdown बॉलिवूडच्या फोटोग्राफर्ससाठी एकता कपूरचा पुढाकार, दिली आर्थिक मदत

एका मागोमाग एक मिळाले सिनेमा

बरेच कष्ट केल्यानंतर रोहितला असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुहाग सिनेमासाठी काम करण्याची संधी मिळाली. ज्यात अजय देवगण आमि अक्षय कुमार लीड रोलमध्ये होते. या सिनेमात रोहितनं अक्षयची डबल बॉडी बनूनही काम केलं. त्यानंतर त्याला 'हिंदुस्तान की कसम', 'राजू चाचा', 'हकीकत' आणि 'प्यार तो होना ही था' या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

 

View this post on Instagram

 

If everything seems under control... you are playing it Safe... Take risk and achieve your dream... Fear Factor #khatronkekhiladiseason10

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on

आज आहे करोडोंचा मालक

आपल्या जबाबदाऱ्या कमी वयात समजणाऱ्या रोहितला अखेर त्याच्या कठोर परिश्रमांचं फळ मिळालं. आज तो करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. एका सिनेमाचं दिग्दर्शक करण्यासाठी रोहित जवळपास 25 कोटी रुपये एवढी फी घेतो. याशिवाय जाहिराती आणि प्रमोशनच्या माध्यमातून त्याची 8 कोटी रुपयांची कमाई होते. मुंबईमध्ये रोहितची 2 अलिशान घरं आहेत. याशिवाय अनेक लग्जरी गाड्या त्याच्याकडे आहेत.

(संपादन : मेघा जेठे.)

लॉकडाऊनमध्ये सनी लिओनी करतेय एरोबिक्स, हॉट रेट्रो लूकमधील VIDEO व्हायरल

First published: April 23, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading