दरम्यान सलमान खान ज्या फिटनेस व्हिडीओबाबत बोलला तो नेमका कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेता प्रफुल पटेल यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटवरून शेअर केला होता. अनेक नेतेमंडळींना आणि सलमान खानला देखील पटेल यांनी या व्हिडीओमध्ये टॅग केलं होतं. 'मी घरातच राहणार असून निरोगी आणि अॅक्टिव्ह राहणार आहे', अशी कॅप्शन देत त्यांनी शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सलमान खान, किरण रिजीजू यांना देखील फिट राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर रिप्लाय देताना सलमान खान याने त्यांचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रफुल पटेल विविध प्रकारचे व्यायामप्रकार, योग करताना दिसत आहेत.Praful sirrr, just saw your fitness video... Superb! @praful_patel
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 22, 2020
दरम्यान या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी देखील प्रफुल पटेल यांंच्या फिट राहण्याचं कौतुक केलं आहे. 'तसंच कोव्हिड-19 ला हरवल्यानंतर आपण फुटबॉल खेळू..' असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.I am going to #BeActive & stay #HealthyAtHome at all times. Come join me, let's all stay fit@FIFAcom @IndianFootball @PawarSpeaks @narendramodi @OfficeofUT @supriya_sule @BeingSalmanKhan @KirenRijiju @FitIndiaOff @theafcdotcom @drharshvardhan #IndianFootball #StayHomeStaySafe pic.twitter.com/vVwarT2ND0
— Praful Patel (@praful_patel) April 16, 2020
सध्या कोरोनाशी लढताना प्रत्येकानी फिट राहणं अत्यंत गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारक्षमताच या संकटाच्या काळात तारणहार आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेत सर्वांनीच निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायला हवे. संपादन - जान्हवी भाटकरNo wonder you remain young and fit @praful_patel ji.. After defeating COVID-19 we will do ⚽️⚽️ pic.twitter.com/90pYkfEpci
— Kiren Rijiju (@KirenRijiju) April 18, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Praful patel, Salman khan