मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिनाला मुंबईत सोडून इंदूरला रवाना झाला विकी कौशल, पण काही तासातच सतावू लागली पत्नीची आठवण

कतरिनाला मुंबईत सोडून इंदूरला रवाना झाला विकी कौशल, पण काही तासातच सतावू लागली पत्नीची आठवण

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी दोघांचे नाते नेहमीच मीडियापासून लपवून ठेवले.  पण लग्नानंतर आता या दोघांच्या रोमान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 20 डिसेंबर- कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी दोघांचे नाते नेहमीच मीडियापासून लपवून ठेवले. दोघांनी कधीच सार्वजनिक पणे प्रेमाची कबुली दिली नाही. पण लग्नानंतर आता या दोघांच्या रोमान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. या महिन्यात कतरिनासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर (Vicky Kaushal Wife) विकी कौशल आपल्या पत्नी कतरिनासोबत काही दिवस घालवल्यानंतर आपल्या कामावर परतला आहे. कतरिना त्याला मिस करत आहे. कतरिना आणि विकी यांचे हे प्रेम इन्स्टावर स्पष्टपणे दिसत आहे.

कतरिना आणि विकी या दोघांनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एकच फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिनाने विक्कीचा हात पकडला आहे. या फोटोत कतरिनाच्या हातवरची मेंदी आणि लाल चुडा दिसत आहे. यावरून कतरिना विकीला किती मिस करत आहे हेच दिसत आहे. तर विकी देखील तिला किती मिस करत आहे हे दिसून येत आहे. काही तासातच दोघांनाही आठवन येत आहे.

 Katrina Kaif, Vicky Kaushal

बॉलिवूडकरांना मिळणार नाही रिसेप्शन

आज सकाळी विकी कौशल त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे. विकीच्या पुढील चित्रपटाचे चित्रीकरण इंदूरमध्ये होणार आहे. विकी कामावर परतल्याने सध्या ही जोडी बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोणतेही रिसेप्शन देण्याची तयारी करत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

वाचा-पनामा पेपर्स प्रकरण: चौकशीसाठी ऐश्वर्या राय बच्चन दिल्लीत ED समोर हजर

विकी आणि कॅटचे ​​लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या चौथच्या बरवाडा येथे या महिन्यात झाले. हे लग्न अतिशय आलिशान झाले आहे. या जोडप्याने लग्नाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal