मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif सोबतच्या नात्यावर Vicky Kaushal ने स्वत: केलं शिक्कामोर्तब? म्हणाला- लवकरच साखरपुडा...

Katrina Kaif सोबतच्या नात्यावर Vicky Kaushal ने स्वत: केलं शिक्कामोर्तब? म्हणाला- लवकरच साखरपुडा...

कतरिना कैफसोबत अफेअरवर Vicky Kaushal ने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला...

कतरिना कैफसोबत अफेअरवर Vicky Kaushal ने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला...

विकी कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ(katrina kaif) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या खूप दिवसांपासून येत आहेत. कतरिनाच्या टीमने ही बातमी अफवा म्हणून फेटाळून लावली होती. आता विकी कौशलने यावर भाष्य केले आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif)यांच्या अफेअरची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी गुपचुप साखरपुडा उरकला असल्याची चर्चादेखील सुरु होती. पण आता यासर्व चर्चेवर विकी कौशलने मौन सोडले आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने त्याच्या लग्नविषयी खुलासा केला आहे. विकी कौशलचा चित्रपट सरदार उधम OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. विकी कौशल या चित्रपटात सरदार उधम सिंह यांच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने बी टाऊनमध्ये सुरु असलेल्या त्याच्या खासगी आयुष्यावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. हे वाचा- अक्षयच्या 'Gorkha' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, पण झाली 'मेजर' चूक विकीने कतरिना कैफसोबत अफेअरच्या चर्चेला फेटाळून लावले आहे. साखरपुड्याच्या अफवा पसरवण्यासाठी विकीने पापाराझींना दोष दिला. त्याने लीडिंग डेलीला सांगितलं की तुम्ही मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. योग्य वेळ आल्यावर मी लवकरच लग्न करेन. त्याची वेळही येईल. असे विकीने यावेळी सांगितले. याआधी, कतरिनाच्या टीमने ही बातमी अफवा म्हणून फेटाळून लावली होती. मागील काही महिन्यांपासून कतरिना आणि विक्की कौशलच्या प्रेमावर अनेक चर्चा होत होत्या. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत अशा चर्चा होत होत्या. मागील महिन्यात दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांनादेखील उधान आले होते. पण त्या दोघांच्या मते, त्यांच्यात मैत्रीपलिकडे काहीच नाही. दोघांनी आता पर्यंत एकत्र कामदेखील केलेले नाही. हे वाचा-  Aryan khan ने एनसीबीला दिले मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...' विकी कौशल आणि कतरिना कैफ अनेकदा एकत्र दिसतात. विकीला अनेक वेळा कतरिनाच्या घरी जाताना पाहिले गेले आहे. एवढंच नाही तर शुक्रवारी कतरिना कैफ सरदार उधमच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजर होती. सरदार उधम पाहिल्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केलं. सरदार उधमचे पोस्टर शेअर करत त्यांनी सुजित सरकारसह विकी कौशलचं कौतुक केलं. तिने लिहिलं – सुजित सरकारची दृष्टी कमाल होती. मनमोहक, उत्तम चित्रपट. शुद्ध कथाकथन. विकी कौशल शुद्ध प्रतिभा, प्रामाणिक आणि हृदयद्रावक आहे. यासह, तिने हार्ट इमोजीदेखील पोस्ट केली आहे.
First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Love story, Vicky kaushal

पुढील बातम्या