मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अक्षयच्या 'Gorkha' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, पण झाली 'मेजर' चूक

अक्षयच्या 'Gorkha' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, पण झाली 'मेजर' चूक

अक्षयच्या 'Gorkha'  चित्रपटाचे पोस्टर रिलीज, पण झाली 'मेजर' चुक

अक्षयच्या 'Gorkha' चित्रपटाचे पोस्टर रिलीज, पण झाली 'मेजर' चुक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा(Akshay Kumar) एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ (gorkha first look)असून त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) नवा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. या चित्रपटाच नाव गोरखा (Gorkha)असून अक्षयने नुकतचं फर्स्ट लूकचे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर रंगली असतानाच माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी पोस्टरमधील गंभीर चूक लक्षात आणुन दिली आहे. तसेच, त्यांनी ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. अक्षयचा हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो (Ian Cardozo) यांच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, त्याने चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. अक्षयचे हे ट्विट पाहत असतानाच माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी ट्विट करत पोस्टरमधील चूक निर्दशनास आणून दिली आहे.

काय आहे गंभीर चुक?

“प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी आहे. त्यामुळे तुम्ही या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पण तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील खुकरी ही व्यवस्थित दाखवावी. खुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर खुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. यासाठी मी तुम्हाला खुकरीचा एक फोटोही पाठवत आहे. धन्यवाद,” अशा आशयाचे ट्विट जोली यांनी करत अक्षयाला चूक दाखवली आहे. विशेष म्हणजे, अक्षयने त्यांच्या या ट्विटची गंभीर दखल घेतली आहे. अक्षयने तातडीने त्यांना प्रतिक्रिया देत, “आदरणीय, मेजर जोली जी, तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची अत्यंत काळजी घेऊ. ‘गोरखा’ हा चित्रपट बनवताना मला खूप अभिमान वाटतो आहे. या चित्रपटातून खरं वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे स्वागत केलं जाईल,” असे म्हटले आहे. ‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.. कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती. यापूर्वी अक्षयचे ‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षाबंधन’ हे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत.
First published:

Tags: Akshay Kumar, Entertainment, Film

पुढील बातम्या