मुंबई, 30 ऑक्टोबर : बी टाउनमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये लिंकअप आणि ब्रेकअपच्या चर्चा होत असतात. यातील काही खऱ्या असतात तर काही नुसत्याच अफवा असतात. पण काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं बोललं जात आहे. खरं तर सत्य काय याबद्दल कोणालाच काही माहित नाही मात्र नुकताच दिवाळी पार्टीतील या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार हे दोघंही एका कॉमन सेलिब्रेटी पार्टीमध्ये गेले होते. ज्या पार्टीमध्ये बराच वेळ हे दोघंही एकत्र दिसले. तसेच जेव्हा ते पार्टीतून बाहेर निघाले त्यावेळी हे दोघं एकत्र होते मात्र मीडियासमोर येऊ नये यासाठी कतरिना मागे राहिली. दोघं एकत्र बाहेर आले नाहीत. त्यामुळे आता लोकांना याबाबत संशय येत आहे की, जर हे दोघं फक्त मित्र आहेत तर मग ते एकत्र बाहेर का पडले नाहीत. पार्टीनंतर दोघंही वेगवेगळ्या कारनं निघून गेले. मात्र तोपर्यंत कतरिना आणि विकीमधील ही जवळीक कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यांचा हा व्हिडीओ व्हिडीओ जर्नलिस्ट मानव मंगलानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला. दिवाळीचं सेलिब्रेशन करताना ‘या’ अभिनेत्रीच्या लेहंग्याला लागली आग, थोडक्यात बचाव
काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा झाल्या आणि त्यानंतर अचानक विकीचं नाव कतरिना कैफशी जोडलं जाऊ लागलं. मात्र हे दोघं एकत्र स्पॉट केले जाण्यापलिकडे यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!
दिवाळी पार्टीबद्दल बोलायचं तर कतरिनानं या पार्टीसाठी रेड कलरचा लेहंगा परिधान केला होता. या ड्रेसवर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. या ड्रेसमध्ये ती खूपच मोहक दिसत होती. तर दुसरीकडे विकी कौशलनं सफेद रंगाचा कुर्ता पायजमा आणि त्यावर ब्लू जॅकेट घातलं होतं. मात्र त्यांच्या लुक पेक्षा आता सोशल मीडियावर त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचीच चर्चा जास्त सुरु आहे. नेहा कक्करच्या गाण्यानंतर चाहत्यांनी सुरू केलं रडायला, VIDEO VIRAL =================================================================== SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही…शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

)







