मुंबई 29 ऑक्टोंबर : दिवाळीचा उत्सव अजून संपलेला नाहीये. सगळीकडेच दिवाळी उत्सव सुरू असताना बॉलिवूडतरी मागे कसं राहणार. नाहीतरी बॉलिवूडमध्ये प्रत्येकच सण आणि उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ईद पासून ते दिवाळीपर्यंत आणि होळी पासून ते गणेशोत्सवापर्यंत सगळेच सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळीची धूम असून सगळेच सेलिब्रिटी पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. अशा एका दिवाळी पार्टीत अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma)ला चांगला फटका बसला. तिच्या लेहंग्याला (Lehenga Caught Fire) खाली ठेवलेल्या दिव्यामुळे आग लागली आणि तो थोडा जळला. त्यात ती थोडक्यात वाचली. त्या जळालेल्या लेहंग्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो खूप व्हायरल होतोय.
नेहा कक्करच्या गाण्यानंतर चाहत्यांनी सुरू केलं रडायला, VIDEO VIRAL
निया शर्माने या पार्टीसाठी सिल्व्हर कलरचा लेहंगा घातला होता आणि सिल्व्हर ज्वेलरीही घातली होती. ज्या ठिकाणी पार्टी होती तिथे दिव्यांची सजावट केली होती. सगळीकडेच दिवे ठेवलेले होते आणि त्या मंद प्रकाशात सगळेच सेलिब्रिटी डान्सच्या मुडमध्ये होते. त्यामुळे फिरताना नियाचा लेहंगा दिव्यावर पडला आणि त्याने पेट घेतला. तिथे असणाऱ्यांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी लगेच ती आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
प्रियकाचं अमेरिकेत दिवाळी सेलिब्रेशन, निक सोबतचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल
त्याचा फोटो नियाने आपल्या Instagram वर शेअर केलाय. त्यात ती लिहिते की, दिव्यात मोठी शक्ती आहे. एका सेकंदात आग लगाली आणि लेहंगा जळला. त्यात अनेक लेअर्स असल्याने आग पुढे सरकली नाही आणि दुर्घटना टळली. यावरुन ती घाबरलेली होती असंही लक्षात येतं.
मात्र या घटनेनंतरही ती सावरली आणि नियाने पूर्ण पार्टी मस्त पैकी एन्जॉय केली. त्या पार्टीतला डान्स करतानाच व्हिडीओही तिने आपल्या Instagramवर शेअर केलाय.