रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर: 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिंकू अर्थात आर्ची यावेळी चर्चेत येण्याचे कारण चित्रपटाशी संबंधित नाही. रिंकूचा कोणाही नवा चित्रपट येणार नाही किंवा तशी घोषणाही झालेली नाही. तरी देखील रिंकू चर्चेत आली आहे. दिवाळी निमित्त रिंकूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

रिंगूने दिवाळी निमित्त साडीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीतील रिंकूचा फोटो चाहते घायाळ झाले आहेत. रिंगू फक्त स्वत:चा फोटो नाही तर कुटुंबीयांसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोत रिंकूचे आई-वडिल आणि लहान भाऊ देखील दिसत आहे. मराठीतील सुपरहिट ठरलेल्या 'सैराट' चित्रपटातून रिंगूने पदार्पण केले होते. सैराटनंतर तिने एका कन्नड चित्रपटात देखील काम केले होते. त्यानंतर रिंकूने 'कागर' या मराठी चित्रपटात भूमिका केली होती. येत्या डिसेंबर महिन्यात नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटात रिंकू दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची देखील भूमिका आहे. रिंकूचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 05:51 PM IST

ताज्या बातम्या