मुंबई 09 डिसेंबर : विकी कौशल
(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ
(Katrina Kaif) आज, गुरुवारी (9 डिसेंबर) लग्नबंधनात
(Katrina-Vicky Marriage) अडकणार आहेत. या दोघांच्या कुटुंबांबद्दल चाहत्यांना
(Fans) जास्तीत जास्त जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुम्हाला माहिती आहे का, केवळ विकी कौशल याचाच बॉलिवूडशी संबंध नाही, तर त्याचे वडील शाम कौशल
(Sham Kaushal) यांचेही बॉलिवूडशी
(Bollywood) घट्ट नाते आहे. विकीच्या वडिलांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
स्टंट एक्सपर्ट म्हणून काम
शाम कौशल हे त्यांचा मुलगा विकी कौशल याच्यासारखे अभिनेते नाहीत, तर ते स्टंटमॅन आणि अॅक्शन डायरेक्टर म्हणून चित्रपटांशी जोडलेले आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे ते अॅक्शन डायरेक्टर आहेत. शाम कौशल यांनी अनेक मोठ्या अभिनेत्यांसाठी स्टंट दिग्दर्शित केले आहेत.
हेही वाचा -
विकी-कतरिनाचं लग्न आधीच झालं आहे का? विकिपीडिया पेजवरील नोंद पाहिली का?
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, रणवीर सिंग, हृतिक रोशन, वरुण धवन यांसारख्या स्टार्ससाठी शाम कौशल यांनी चित्रपटांमध्ये स्टंट केले आहेत. विकीच्या वडिलांचं शाहरुख खानशी विशेष नातं आहे. कारण त्यांनी शाहरुखच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये स्टंट दिग्दर्शित केले आहेत.
शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांसाठी काम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलचे वडील शाम कौशल हे शाहरुखच्या 'माय नेम इज खान', 'रब ने बना दी जोडी', 'ओम शांती ओम' या चित्रपटांचे स्टंट डायरेक्टर होते. शाहरुखच्या 2012 मध्ये आलेल्या 'जब तक है जान' चित्रपटातही त्यांनी स्टंट दिग्दर्शन केले होते. 'बादशाह', 'देवदास' या चित्रपटांसाठी त्यांनी स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिलं होतं.
सलमान खान सोबत चांगले संबंध
शाम कौशल यांचे कतरिनाचा जवळचा मित्र अभिनेता सलमान खानशी चांगले संबंध आहेत. सलमानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटासाठी त्यांनी अॅक्शन कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले होते. तसेच शाम कौशल यांनी 'दंगल', 'पद्मावत', 'कलंक' या चित्रपटांसाठी स्टंट कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले होते. 'काबिल' आणि 'कलंक' या चित्रपटांचे ते स्टंट डायरेक्टर होते.
हेही वाचा -
सुरक्षेचा काय फायदा, शेवटी व्हायचं तेच झालं कतरिनाच्य मेंदीचे फोटो viral
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या खूप चर्चा आहे. हे दोघे आज, 9 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबातील व्यक्ती आणि आमंत्रित पाहुणे यांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये सवाई माधवपूर येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडच्या या हॉट जोडीला विवाहबंधनात अडकलेले पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.