मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी-कतरिनाचं लग्न आधीच झालं आहे का? विकिपीडिया पेजवरील नोंद पाहिली का?

विकी-कतरिनाचं लग्न आधीच झालं आहे का? विकिपीडिया पेजवरील नोंद पाहिली का?

विराट-अनुष्का, रणवीर सिंह-दीपिका यांच्यानंतर सध्या तरी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हा विवाहसोहळा आहे. त्याची दृश्यं, फोटो बघण्यासाठी नक्कीच फॅन्स उत्सुक आहेत.

विराट-अनुष्का, रणवीर सिंह-दीपिका यांच्यानंतर सध्या तरी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हा विवाहसोहळा आहे. त्याची दृश्यं, फोटो बघण्यासाठी नक्कीच फॅन्स उत्सुक आहेत.

विराट-अनुष्का, रणवीर सिंह-दीपिका यांच्यानंतर सध्या तरी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हा विवाहसोहळा आहे. त्याची दृश्यं, फोटो बघण्यासाठी नक्कीच फॅन्स उत्सुक आहेत.

मुंबई, 9 डिसेंबर : बॉलिवूडच्या बिग फॅट वेडिंग्जची नेहमीच चर्चा असते. आणि आता सगळ्यांचंच लक्ष विकी कौशल- कतरिना कैफच्या लग्नसोहळ्याकडे लागलं आहे. कितीही गुप्तपणे लग्न होणार असं म्हटलं, तरी या दोघांच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्या आणि मग अगदी लग्न मंडपापासून ते जेवणापर्यंत सगळ्याच्याच चर्चा सुरू झाल्या. या लग्नसोहळ्यातली दृश्यं बघण्यासाठी दोघांचेही फॅन्स अगदी उत्सुक आहेत. राजस्थानमधल्या बरवाडा इथल्या सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये हा लग्नसोहळा होत आहे. विकी कौशल याच्या विकिपीडिया (Wikipedia) पेजवर मात्र विकीची जोडीदार म्हणून कतरिनाचं नाव यापूर्वीच प्रसिद्ध झालेलं आहे.

कोणत्याही व्यक्तीची माहिती देणाऱ्या विकिपीडिया पेजवर जोडीदार म्हणजेच स्पाउझ (SPOUSE) असा उल्लेख करून त्यात संबंधित व्यक्तीच्या पती/पत्नीचं नाव दिलेलं असतं. विकीच्या विकिपीडिया पेजवर असतो आधीपासूनच कतरिनाचं नाव आहे. ही अनवधानाने झालेली चूक आहे, की थट्टा म्हणजे प्रँक करण्यात आला आहे, की खरंच विकी याआधीच कतरिनाशी विवाहबद्ध झाला आहे, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. या दोघांनी आधीच कोर्ट मॅरेज केल्याचीही अफवा आहे. गुप्तपणे कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता हे दोघे एका सोहळ्यात विवाहबद्ध होणार असल्याचं बोललं जात आहे. कतरिना आणि विकी या दोघांचे अत्यंत जवळचे मित्र फराह खान आणि करण जोहर हे दोघेही लग्नाच्या ठिकाणी आधीच पोहोचले असल्याचीही माहिती आहे. या लग्नासाठी अगदी जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. फराह खान आणि करण या दोघांनी नुकताच एक रील व्हिडिओ (Reel Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या हॉटेल रूममधून आणि बहुधा सिक्स सेन्सेस रिसॉर्टच्या रूममधून काढला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

या शाही विवाहसोहळ्यासाठी नवरदेव विकी कौशलचं एकदम स्टाइलमध्ये आगमन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सात घोडे असलेल्या रथातून तो आपल्या विवाहस्थळी प्रवेश करील, असं सांगण्यात येत आहे. सवाई माधोपूरमध्ये चौथ का बरवाडा (Barwada) इथं सिक्स सेन्सेस (Six senses) रिसॉर्टमध्ये या तीन दिवसांच्या शाही विवाह सोहळ्याला सात डिसेंबरपासूनच सुरुवात झाली आहे. सात तारखेला रात्री संगीत सोहळाही (Sangeet Night) मोठ्या थाटामाटात पार पडला. या संपूर्ण परिसराला रोषणाई करण्यात आली होती आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. त्यापूर्वी नवरीच्या हाताला राजस्थानमधली प्रसिद्ध सोजत (Sojat) शहराची मेंदी लावण्यात आली. जवळपास एक तास हा मेंदीचा कार्यक्रम सुरू होता. या विवाहसोहळ्याला अर्थातच बॉलिवूडमधले अनेक झगमगते तारे हजेरी लावणार हे निश्चित आहे. यात शाहरुख खान (Shahrukh Khan), करण जोहर (Karan Johar) आणि आलिया भट (Alia Bhat) प्रामुख्यानं हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा-विकी-कतरिनाच्या लग्नानंतर श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा; मावशीनी दिली हिंट

या भव्यदिव्य विवाह सोहळ्यामुळे या गावातले ग्रामस्थ मात्र नाराज झालेत. या सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या तयारीमुळे आपल्याच गावात आपल्याला मोकळेपणानं फिरता येत नसल्यानं गावकरी काहीसे नाराज आहेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे. बॉलिवूडमध्येही सध्या विकी-कतरिनाचा लग्नसोहळा हा चर्चेचा विषय आहे. ‘मनकर्णिका’ फेम अभिनेत्री कंगना राणावतनं (Kangana Ranawat) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल लिहिलं आहे. विकी कौशल कतरिनापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. याचाच संदर्भ घेऊन कंगनानं आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘जेंडर स्टिरिओटाइप्स (Gender Stereotypes) म्हणजेच पठडीच्या बाहेर जाऊन विचार करणाऱ्या पुरुष आणि महिलांचं अभिनंदन’असं तिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

विराट-अनुष्का, रणवीर सिंह-दीपिका यांच्यानंतर सध्या तरी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हा विवाहसोहळा आहे. त्याची दृश्यं, फोटो बघण्यासाठी नक्कीच फॅन्स उत्सुक आहेत.

First published:

Tags: Jaipur, Katrina kaif, Marriage, Shah Rukh Khan, Vicky kaushal