मुंबई, 8 डिसेंबर - कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या ( Katrina-Vicky wedding ) लग्नाला आता फक्त एक दिवस उरला आहे. कतरिना आणि विकी 9 डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा) (Vicky-Katrina's Wedding Venue Six Senses Fort ) येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याचबरोबर लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली (Katrina Kaif and Vicky Kaushal wedding LIVE Updates) आहे. 7 डिसेंबर रोजी मेहंदी आणि संगीत विधी पूर्ण झाले, तर आज (8 डिसेंबर) हळदीचा विधी पार पडला. या दोघांचा विवाह सोहळा पूर्णत: गोपनीय ठेवण्यात आला असून त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नाला ) (Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding Day 1 LIVE UPDATES ) येणाऱ्या पाहुण्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस अशा तशी नोटीस नसून, मोबाईल फोनचा वापर करू नये आणि मोबाईल फोनवरून कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही प्रकारे सार्वजनिक करू नये यासाठी इव्हेंट कंपनीने ही नोटीस बजावली आहे. असे असूनही, कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Katrina Kaif-Vicky Kaushal wedding venue PICS ) होत आहेत, ज्यात तिने हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे.
वाचा : कतरिना -विकीच्या लग्नावर कंगनाची अशी होती प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, हे फोटो कतरिना कैफच्या मेहंदी सोहळ्यातील आहेत. फोटोंमध्ये कतरिना कैफ खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या हातावरची मेंदीही खूप छान दिसत आहे. तसेच, ती नववधूच्या वेशभूषेत दिसत आहे, परंतु प्रश्न असा आहे की एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही एखाद्याचे फोटो इंटरनेटवर कसे व्हायरल होऊ शकतात? मग हे व्हायरल झालेले फोटो मागचे सत्य काही वेगळेच आहे.
कतरिना कैफचे हे फोटो पाहून कोणाचीही फसवणूक होऊ शकते, कारण या फोटोंमध्ये ती नव्या नवरीइतकीच सुंदर दिसत आहे.पण सत्य हे आहे की, कतरिनाची हे सर्व फोटो बनावट आहेत. म्हणजेच हे फोटो कतरिनाच्या मेहंदी सोहळ्यातील नाहीत. वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हो फोटो एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीतील आहेत, ज्यामध्ये कतरिना वेगवेगळ्या वधूच्या अवतारात पाहायला मिळाली. विश्वास बसत नसेल तर खाली दिलेला व्हिडिओ पहा, जो ज्वेलरी ब्रँडचा आहे. ही एक जाहिरात आहे.
या शाही लग्नासाठी सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की, इव्हेंट कंपनीने या लग्नसोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना एक कोडही दिला आहे. फक्त पाहुणे आणि इव्हेंट कंपनीला या कोडची माहिती असते, कोणता कोड कोणत्या अतिथीचा आहे. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत राहणाऱ्या पाहुण्याला शेवटच्या क्षणापर्यंत कोणता पाहुणे कुठे राहतो हे कळू नये म्हणून हे केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal