मुंबई, 22 एप्रिल : निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा (karan johar) ‘दोस्ताना 2’ (dostana 2) चित्रपट तयार होण्याआधीच मोठा चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला (kartik aaryan) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी करण जोहरवर टीकासुद्धा केली होती. त्यानंतर या चित्रपटात आता कार्तिकची जागा कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता कार्तिक आर्यनच्या जागी अभिनेता अक्षय कुमारची (akshay kumar) वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. अक्षय कुमार आणि करण जोहर खूप चांगले मित्रसुद्धा आहेत.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारला ‘दोस्ताना 2’ च्या टीममध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. असं म्हटलं जात आहे की, कार्तिकला चित्रपटातून काढल्यानंतर करण जोहर मोठ्या संकटात आहे. कारण चित्रपटाच्या शूटिंगवर आधीच खूप पैसे खर्च करण्यात आले आहेत. अक्षय कुमारसाठी करण आपल्या स्टोरीमध्ये बदल करण्यासही तयार आहे. कारण आधीची स्टोरी कार्तिक आर्यनला समोर ठेऊन लिहिली गेली होती. मात्र अजूनही याबद्दल टीमकडून कोणतीच खात्रीशीर माहिती आलेली नाही.
हे वाचा - Dance Diwane 3 च्या सेटवर कोरोनाचा हाहाकार! धर्मेश नंतर राघवही Corona Positive)
काही दिवसांपूर्वी करण जोहरने कार्तिक आर्यनला चित्रपटातून काढल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करण जोहरला ट्रोल करण्यात आलं होतं. अनेक चाहत्यांनी करण जोहरला खडेबोल सुनावले होते. त्याच्या फिल्मवर बहिष्कार टाकण्याची तयारीही केली. शिवाय अभिनेत्री कंगना रणौतनेही करणवर निशाणा साधला होता. सुशांतसारखं फासावर लटकण्याची वेळ कार्तिकवर आणू नका, असं ट्वीट तिने केलं होतं. त्यामुळे हा चित्रपट तयार होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
हे वाचा - बिग बींनी राजकारणात येण्यास दिला होता नकार, सोनिया गांधींना दिलं होतं असं उत्तर)
‘दोस्ताना 2’ ही एक कॉमेडी लवस्टोरी असणार आहे. 2008 मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि बॉबी देओल यांच्या भूमिका होत्या. तर ‘दोस्ताना 2’ मध्ये जान्हवी कपूर आणि लक्ष लालवाणी यांच्या भूमिका आहेत. मात्र लक्ष आणि जान्हवी बहीणभावाच्या भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे मुख्य पात्र कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अक्षयबद्दल सांगायचं झालं तर तो सध्या अनेक चित्रपटांत व्यस्त आहे. ‘रामसेतू’नंतर अक्षय सायन्स फिक्शन ‘मिशन लॉयन’ या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. याआधी अक्षयने धर्मा प्रोडक्शनच्या ‘गूड न्यूज’ या चित्रपटात काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Bollywood actor, Entertainment, Karan Johar, Kartik aryan