मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /valentines day 2023: ...म्हणून ऐश्वर्यानं सलमानला सोडून धरला अभिषेक बच्चनचा हात; दोघांची ब्रेकअप स्टोरी फारच थ्रीलर

valentines day 2023: ...म्हणून ऐश्वर्यानं सलमानला सोडून धरला अभिषेक बच्चनचा हात; दोघांची ब्रेकअप स्टोरी फारच थ्रीलर

Salman-Aishwarya Breakup

Salman-Aishwarya Breakup

तब्बल 2 वर्ष त्यांनी डेटिंग केली. पण दोघांचं नातं अर्ध्यावरच संपुष्टात आलं. सलमान आणि ऐश्वर्याची ब्रेकअप स्टोरी नक्की कशी होती पाहूयात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  08 फेब्रुवारी : 'हम दिल दे चुके सनम' म्हणत प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारं कपल म्हणजे सलमान आणि ऐश्वर्या. सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. एक काळ असा होता जेव्हा फक्त सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमाचा सिलसिल पाहायला मिळत होता. दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते. एकमेकांबरोबर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. ऐश्वर्याच्या प्रेमात पागल झालेल्या सलमानला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. तब्बल 2 वर्ष त्यांनी डेटिंग केली. पण दोघांचं नातं अर्ध्यावरच संपुष्टात आलं. सलमान आणि ऐश्वर्याची ब्रेकअप स्टोरी नक्की कशी होती पाहूयात.

'हम दिल दे चुके सनम' या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या सेटवर सलमान-ऐश्वर्या यांच्या प्रेमाला सुरूवात झाली. ऐश्वर्या आणि सलमानच्या जोडीनं ऑनस्क्रिन अनेक हिट सिनेमे दिले मात्र ऑफस्क्रिन दोघांची जोडी फ्लॉप ठरली. 'हम दिल दे चुके सनम'  सिनेमात दोघांनी सिनेमात जीव तोडून काम केलं. दोघांनी ऑनस्क्रिन केमिस्ट्री ऑफस्क्रिन देखील तितकीच रंगली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र सलमानबरोबर ऐश्वर्याचं नात तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं. त्यांनी तिला आधीच त्याच्यापासून दूर राहण्याची ताकिद दिली होती. ऐश्वर्यानं रागानं घर देखील सोडलं होतं, असं म्हटलं जातं.

हेही वाचा - Valentines day 2023: आधी गुपचूप साखरपुडा केला; नंतर लग्न करायचं सोडून अक्षय-रवीनाचा ब्रेकअप झाला

2 वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमाननं ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली. तेव्हा ऐश्वर्याचं करिअर पिक पॉइंटला होतं. त्यामुळे लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तिन नकार दिला. यामुळे सलमान तिच्यावर खूप भडकला होता. एकेदिवशी सलमान दारूच्या नशेत तिच्या घरी पोहोचला पण तिनं दरवाजा उघडला नाही.  रागात असलेल्या सलमाननं 19व्या मजल्यावरून उडी मारून जीव देण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकारानंतर ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान विरोधात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान ऐश्वर्याला तिचे वडील न सांगता तिला अमेरिकेला घेऊन गेले होते. सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली त्याच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या वडिलांची तब्येत ठिक नाहीये म्हणत सलमानकडे मदत मागितली होती. सलमाननं तिला मदत केली.  ही बाब ऐश्वर्या कळताच तिनं दोघांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. पण सलमानला हे मान्य नव्हतं.

असं म्हटलं जातं की, ऐश्वर्याच्या 'कुछ ना कहो'च्या सेटवर सलमाननं धिंगाणा घातला होता. दोघांचं कडाक्याचं भांडणं झालं होतं. दोघांच्या ब्रेकअपच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. दोघांचं नातं संपुष्टात येण्याचं प्रत्येक जण वेगवेगळं कारण देताना दिसतं. काहींचं म्हणणं आहे की, 'सलमानच्या अशा वागण्यामुळे ऐश्वर्यानं त्याला सोडलं'. तर 'ऐश्वर्याच्या अग्रेसिव्ह स्वभवामुळे त्यांचं नातं तुटलं' तर काहींच्या म्हणण्यानुसार 'सलमाननं तिला फिजिकली आणि मेंटली त्रास दिला'. तसंच 'ऐश्वर्याला तिचं करिअर करायतं होतं त्यामुळे तिनं लग्नाला नकार दिला', असंही म्हटलं जातंय.  दोघांच्या ब्रेकअपचं खरं आणि ठोस कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. सलमानचा हात कायमचा सोडल्यानंतर अखेर ऐश्वर्यानं अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा हात आयुष्यभरासाठी धरला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News