जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Valentines day 2023: आधी गुपचूप साखरपुडा केला; नंतर लग्न करायचं सोडून अक्षय-रवीनाचा ब्रेकअप झाला

Valentines day 2023: आधी गुपचूप साखरपुडा केला; नंतर लग्न करायचं सोडून अक्षय-रवीनाचा ब्रेकअप झाला

Akshay-Raveena Break Up

Akshay-Raveena Break Up

ऑनस्क्रिन चाहते दोघांच्या प्रेमात होते मात्र ऑफस्क्रिन दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. अक्षय कुमार आणि रवीना टंडण यांचंही ब्रेकअप झालं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  07 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. यशस्वी प्रेम कहाण्या आजवर अनेकांच्या आहेत. मात्र एकमेकांवर अमाप प्रेम असूनही ब्रेकअप झाल्याच्या कहाण्या फार कमी लोकांना माहिती असतील. बॉलिवूडमधील असंच एक कपल म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडण . दोघेही बॉलिवूडमधील एकेकाळचे स्टार कलाकार होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांना गुपचूप साखरपुडा देखील उरकला होता. ऑनस्क्रिन चाहते दोघांच्या प्रेमात होते मात्र ऑफस्क्रिन दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांच्या लग्नाच्या भरपूर चर्चा झाल्या. मात्र शेवटी नात लग्नापर्यंत कधी पोहोचूच शकलं नाही. पाहूयात अक्षय आणि रवीना यांची ब्रेकअप स्टोरी. ‘मोहरा’ सिनेमावेळी अक्षय आणि रवीनाच्या प्रेमाची मोहोर उमटली. 1994मध्ये अलेल्या या सिनेमानं दोघांच्या आयुष्याला कलाटणी दिली. सिनेमाचं शुटींग संपलं आणि दोघांच्या खऱ्या आयुष्यातील शुटींग सुरू झालं होतं. मोहरा सिनेमाच्या शुटींगनंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. सिनेक्षेत्रात दोघांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांची ऑनस्क्रिन जोडी इतकी हिट झाली होती की दोघांना एकत्र अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.  ‘मोहरा’, ‘बारूद’, ‘खिलाडियो का खिलाडी’, ‘किमत ‘सारख्या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. हेही वाचा - Valentines day 2023: नर्गिसच्या लग्नानंतर स्वत:ला सिगरेटचे चटके द्यायचे राज कपूर; ब्रेकअप नंतर ढसाढसा रडला अभिनेता अक्षय आणि रवीना एकमेकांबरोबर खूप फिरायचे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी गुपचूप साखरपुडा केला होता पण याची माहिती कोणालाही कळू दिली नव्हती. साखरपुड्याची गोष्ट कधीच मीडिया समोर मान्य केली नव्हती. दोघेही लग्नाचं प्लानिंग करत होते. पण त्यांचं प्लानिंग अर्ध्यावरच राहिलं. लग्न करायचं सोडून दोघांनी ब्रेकअप केला.

News18लोकमत
News18लोकमत

रवीना टंडणनं एका मुलाखतीत त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. रवीना म्हणाली होती, ‘आमच्या दोघांचं करिअर तेव्हा टॉपवर होतं. अक्षयमुळे मला माझं सुरळीत सुरू असलेलं करिअर थांबवायचं नव्हतं’. अक्षयनं रवीना लग्नानंतर सिनेमात काम न करण्याची अट ठेवली होती. तो म्हणाला होतो की, ज्या दिवशी तू सिनेमात काम करणं थांबवशील तेव्हा मी तुझ्याशी लग्न करेन. अक्षयची ही अट रवीनानं आनंदानं मान्यही केली होती. रवीनानं अक्षयची अट मान्य केली होती. पण तरीही दोघे वेगळे झाले.  मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनं अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. त्यातील एक रवीना देखील होती. रवीना बरोबर रिलेशनमध्ये असताना अक्षय कुमार अभिनेत्री शिल्पा शेट्टीलापण डेट करत होता. हे रवीनाला कळताच तिनं अक्षयबरोबर असलेलं नातं कायमचं संपवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात