मुंबई, 10 जानेवारी: अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दोघीही सातत्याने एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही म्हणत तिच्या फॅशन स्टाइलवर आक्षेप घेतला. तिला अटक करण्याची देखील मागणी केली. त्यानंतर उर्फीही काही मागे हटली नाही. या दोघीत ट्विटर वॉर सुरू आहे. हे ट्विटर वॉर काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आता चित्रा वाघांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या माध्यमातून उत्तर देताना दिसतेय. काल उर्फीनं चित्र वाघ यांना उद्देशून यावेळी ट्विट करत, ‘मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू’ असं म्हटलं होतं. तिच्या या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. तर तिच्या या ट्विट नंतर चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधला होता. ‘विरोध केला नाही तर चौका चौकात नागडे नाच पाहायला मिळतील’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता उर्फीच एक ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. हेही वाचा - Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही ‘वेड’ची भुरळ; सिनेमा पाहण्यासाठी थेट अख्खं थिएटर केलं बुक! या ट्वीटमध्ये तिने चारोळी टाकली आहे. ‘उर्फी की अंडविअर मे छेद है, चित्रा ताई ग्रेट है’ असं ट्वीट तिने केलं आहे. त्यात स्वतःच्याच अंतर्वस्त्राचा उल्लेख करत तिने चित्रा वाघ महान असल्याचं म्हटलंय. त्यावर तिने तीन रेड हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. तिचं हे ट्विट आता वेगात व्हायरल होत असून त्यावर काही जण तिला समर्थन देतायत तर काही जण चांगलंच ट्रोल करत आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत मुंबई पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे मोर्चा देखील काढला. चित्रा वाघांच्या तक्रारी नंतर उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला. तुमच्यसारखे राजकारणी माझा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही असा सवाल केला.
त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या या युद्ध्यात अनेक राजकारण्यांनी मध्ये पडत आपलं मत नोंदवलं होतं. आता हे प्रकरण चांगलाच तापलं असून येणाऱ्या काळात कुठलं वळण घेणार ते पाहून महत्वाचं ठरणार आहे.