जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed: उर्फी जावेदने सोडला रोहित शेट्टीचा शो; ऑफर नाकारण्याचं कारण ऐकून व्हाल चकित

Urfi Javed: उर्फी जावेदने सोडला रोहित शेट्टीचा शो; ऑफर नाकारण्याचं कारण ऐकून व्हाल चकित

उर्फी जावेद

उर्फी जावेद

ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी नेहमीच काहीतरी नवनवीन करत चर्चेत येत असते. आता तिला मोठमोठ्या शोच्या ऑफर येत आहेत. पण नुकतंच उर्फीने एका मोठ्या शोला नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या बोल्ड आणि हटक्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे सगळ्यांचंच लक्ष वेधते. तिचे अतरंगी लूक नेहमीच व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसते. यामुळेच ती कायम ट्रोल देखील होत असते. पण ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी नेहमीच काहीतरी नवनवीन करत चर्चेत येत असते. आता तिला मोठमोठ्या शोच्या ऑफर येत आहेत. पण नुकतंच उर्फीने एका मोठ्या शोला नाकारल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच उर्फी जावेद ळकेच रोहित शेट्टीचा  रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 13’ च्या आगामी सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता ही अभिनेत्री या शोच्या आगामी सीझनचा भाग नसल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारणही आता समोर आलं आहे. Rakhi Sawant: अदिलशी संसार मोडल्यानंतर राखीनं घेतला मोठा निर्णय; म्हणाली ‘भविष्यात कधीही लग्न करणार…’ अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की उर्फी ‘खतरों के खिलाडी 13’ च्या टीमसोबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा करत होती आणि तिलाही हा शो करण्यात खूप रस होता. पण बॅडलकमुळे ती या शोचा भाग होऊ शकली नाही. उर्फी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी कोणाशी तरी चर्चा करत होती आणि ती खतरों के खिलाडीची ऑफर स्वीकारण्यापूर्वीच ती फायनल झाली होती, त्यामुळे तिला शो सोडावा लागला.’

जाहिरात

तसंच उर्फी लवकरच तिच्या या मोठ्या शोविषयी खूप उत्साहित असून आणि लवकरच ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर करणार आहे. त्यामुळे उर्फीच्या चाहत्यांसाठी ही सोबतच आनंद आणि दुःखाची बातमी आहे. आता ती यापुढे कोणत्या शो मध्ये दिसणार हे पाहणं महत्वाचं आहे. उर्फी तिच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती अलीकडेच एका साऊथ मॅगझिनच्या डिजिटल कव्हरवर डिझायनर कपड्यांमध्ये  दिसली होती. ती प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनची मॉडेल देखील बनली. त्याचा फोटो शेअर करत उर्फीने लिहिले होते की, “अबू जानी संदीप खोसला यांच्यासाठी मॉडेल बनून मला खूप आनंद झाला आहे.”

News18लोकमत
News18लोकमत

उर्फीने पुढे लिहिले की, “कोणताही डिझायनर मला कपडे देत नव्हता, म्हणून मी माझे कपडे स्वतः बनवायला सुरुवात केली. अबू आणि संदीपने माझ्यासाठी ते बदलले.” उर्फी शेवटची स्प्लिट्सविला X4 मध्ये मिशिफ मेकर म्हणून दिसली होती. यावेळी हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी यांनी होस्ट केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात