'ड्रामा क्वीन' राखी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. तिच्या संसाराचं सत्य चव्हाट्यावर आलं. तिच्यावर एकामागे एक संकटं कोसळली. आधी आईचं निधन झालं, मग अदिलने धोका दिला. या सगळ्यात राखीने अदिलला तुरुंगात पोहचवलं.
राखी दुबईत अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी डान्स आणि ऍक्टिंगचं प्रशिक्षण देणारी अकादमी सुरु करणार आहे. त्यानंतर तिच्याविषयी अजून एक मोठी बातमी समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने म्हटले होते की, आदिल दुर्रानी याला काहीही झाले तरी मी घटस्फोट देणार नाहीये. नुकताच राखी सावंत हिने तिच्या भविष्याचे काही प्लॅनिंग सांगितले आहे.
राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी हा माझ्या आयुष्यात परत घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, जोपर्यंत तो मला लिहून देणार नाही धोका देणार नसल्याचे आणि माझे पैसे वापस देण्याचे तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी त्याला येऊ देणार नाहीये.'
पुढे राखी म्हणाली, 'मी त्याला घटस्फोट देणार नाही कारण त्याने इतर कोणत्याही स्त्रीचे आयुष्य उध्वस्त करावे असे मला वाटत नाही. मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही.'
राखी सावंत म्हणाली की, मी नुकताच दुबई येथे अभिनय अकॅडमी सुरू केलीये. मी लवकरच मुंबईमध्ये येथे देखील अकॅडमी सुरू करणार आहे. जिथे मोठे कलाकार घडतील.'