मुंबई, 07 मार्च : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायम चर्चेत असते. बोल्ड अंदाज, हटके फॅशन, अतरंगी कपडे यामुळे उर्फी कायमच चर्चेचा विषय ठरते. रोज नवनवीन हटके लुकमध्ये उर्फी मीडियासमोर येत असते. उर्फी जावेद अनेकदा सोशल मीडियावर बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसते, ज्यामुळे तिला तीव्र टीकेलाही सामोरं जावं लागतं. मध्यंतरी चित्रा वाघांसोबत उर्फीचा वाद चांगलाच तापला होता. आता ते प्रकरण काहीसं शांत झालं असलं तरी उर्फीची अतरंगी फॅशन मात्र अजूनही करणं चालूच आहे. आता होळीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा देताना उर्फीचा अतरंगी लूक समोर आला आहे. उर्फी जावेदने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद पांढरा शुभ्र ड्रेस घालून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. पण यावेळी तिचा फक्त ड्रेसच विचित्र नव्हता तर हेअरस्टाइलही अजब होती. या लूकमुळे उर्फी जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स येत आहेत. Urfi Javed: उर्फी जावेदने खरेदी केली इतकी महागडी कार; पण अभिनेत्रीकडे इतका पैसा येतो कुठून? उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून लोकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, “होळीच्या अनेक शुभेच्छा मित्रांनो…” व्हिडिओमध्ये अभिनेत्री विचित्र पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा पोशाख असा होता की तो पाहून लोक गोंधळून गेले की तिला चालता येईल की नाही. ड्रेसिंग व्यतिरिक्त उर्फी जावेदच्या हेअरस्टाइलनेही लक्ष वेधले. या व्हिडिओमध्ये उर्फीने केलेली हेअरस्टाईल पाहून चाहत्यांना ‘नसीब अपना अपना’ या चित्रपटातील ‘चंदो’ आठवली. तिच्या वाकड्या वेणीसारखीच उर्फीची हेअरस्टाईल दिसत होती. हे पाहून नेटकऱ्यांनी उर्फीवर एकच निशाणा साधला
पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेट आणि हातात हातमोजे घातलेली उर्फी व्हिडिओमध्ये गुलाल उधळताना दिसत आहे. मात्र, यावेळी चाहत्यांच्या नजरा उर्फीच्या फाटलेल्या स्कर्टवर खिळल्या. जी तिने कंबरेवर नव्हे तर गुडघ्यांवर घातला आहे.
टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिला ट्रोल करताना थकत नाहीत. उर्फी जावेदच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, “चांगले फॅशन डिझायनर मागे राहिले आहेत.” त्याचवेळी दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “दीदी, तुला कोणताही रंग लावायला आलं तर या स्कर्टमुळे पळूनही जाता येणार नाही.” अशा मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने उर्फी जावेदला कलंक म्हटले आणि लिहिले की, ही मुलगी एका महिलेच्या नावावर कलंक आहे. तर उर्फीची हेअरस्टाईल पाहून ‘नसीब अपना अपना’ चित्रपटाची आठवण झाली. युजरने लिहिले, “बाल तो अगदी ‘नसीब अपना अपना’ प्रमाणे कॉपी केला आहे.” असं देखील म्हटलं आहे.