जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये भावूक झाली उर्फी जावेद, नक्की काय झालं?

प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये भावूक झाली उर्फी जावेद, नक्की काय झालं?

उर्फी जावेद

उर्फी जावेद

कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या उर्फी जावेदचा लवकरच वाढदिवस येत आहे. 15 ऑक्टोबर रोजी उर्फी जावेद त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 ऑक्टोबर : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या असामान्य ड्रेसिंग सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या उर्फीचा लवकरच वाढदिवस येत आहे. 15 ऑक्टोबर रोजी उर्फी जावेद त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. मात्र आत्तापासूनच तिचं प्री-बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालेलं पहायला मिळत आहे. या आनंदाच्या प्रसंगी फॅशन सेन्सेशन उर्फीची भावूक झाल्याचं पहायला मिळालं. याचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उर्फी कायम बोल्ड लुक, बिनधास्त स्वभाव, बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र ती खूप कमी वेळा इमोशन झालेली पहायला मिळते. मात्र यावेळी  प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आपल्या मैत्रिणींचे प्रेम पाहून उर्फी भावूक झाली. उर्फी जावेदने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिला जवळच्या व्यक्तींचं प्रेम पाहून अश्रू अनावर झाले. इन्स्टा स्टोरीमध्ये ती मित्रांना केक खाऊ घालताना दिसत आहे. उर्फी जावेद या क्षणी भावूक झाली. हेही वाचा -  लग्नाआधीच Urvashi Rautela ने दिल्या करवाचौथच्या शुभेच्छा; रिषभ पंतवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा मित्र आणि चाहत्यांच्या प्रेमानेच उर्फीला रडवले. अन्यथा उर्फी याआधी कधीच एवढी इमोशनल झालेली दिसली नाही. उर्फी 15 ऑक्टोबरला 25 वर्षाची होईल. तीनं या वयातही खूप काही कमावलं आहे. तिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उर्फी जावेदच्या मार्गात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी प्रत्येक अडचणीचा सामना केला आणि इ्थपर्यंत पोहचली आहे.

News18

उर्फी जावेदने टीव्ही मालिकांमध्ये आणि बिग बॉस ओटीटीमध्येही आपले कौशल्य दाखवले. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फीने स्वतःला सिद्ध केले. रोज उर्फी चर्चेत असते. शिवाय तिच्या अतरंगी फॅशनने सगळ्यांना थक्क करत असते. ती आता एक सोशल मीडिया स्टार झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या उर्फी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हाय ही ये मजबुरी’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदचे हे गाणे 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन आहे. या नवीन गाण्यात श्रुती राणेने तिचा आवाज दिला असून राजेश मंथन यांचे बोल आहेत. हे गाणे सारेगामा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात