मुंबई, 12 ऑक्टोबर : सध्या बॉलिवूडमध्ये सातत्यानं चर्चेत येत असलेली अभिनेत्री उर्वशी रौतेला . रिषभ पंतबाबत केलेल्या कमेंट्समुळे उर्वशी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची ही ब्यूट क्विन चर्चेत आली आहे. उर्वशी तिच्या ग्लॅमरस लुकमुळेच नाही तर सोशल मीडियावर पोस्टमुळेही चर्चेत असते. तिची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आलीये. उर्वशीनं थेट करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्न न करता करवा चौथच्या शुभेच्छा दिल्यानं उर्वशी पुन्हा चर्चेत आलीये आणि या चर्चेत क्रिकेटर रि षभ पंत च नाव देखील जोडलं गेलं आहे. उर्वशीनं व्हाइट टॉप, रेड स्कर्ट आणि मॅचिंग हेअरबँड कॅरी करत कँन्डिड पोझेस देत फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करत थेट करवा चौथच्या शुभेच्छा दिल्यात. उर्वशीनं म्हटलंय, “आशा करते की चंद्राच्या प्रकाशासारखी तुमचं आयुष्य आनंद, शांती आणि सद्भावनेनं भरून जावं. इन अडवान्स करवाचौथच्या शुभेच्छा”. उर्वशीच्या या शुभेच्छानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. हेही वाचा - उर्वशी रौतेलाचा पाकिस्तानी क्रिकेटरसोबतचा ‘तो’ व्हिडीओ VIRAL होताच, अभिनेत्री झाली ट्रोल
उर्वशीनं क्रिकेटर रिषभ पंतला करवा चौथचं आमंत्रण दिलं आहे, असं म्हणत उर्वशीला ट्रोल करण्यात आलंय. रिषभबरोबर उर्वशीचं नाव फार आधीच जोडण्यात आलं आहे. मध्यंतरी या चर्चा थांबल्या होत्या मात्र करवाचौथच्या शुभेच्छांनंतर रिषभ पंत पुन्हा चर्चेत आला आहे. “दीदी फोटोबरोबर दर्दभरी शायरी लिहिली नाही”, अशी आठवणही उर्वशीला करून दिली आहे. इतकंच नाही तर “नुसत्या शुभेच्छा दिल्यात करवाचौथचं व्रत करणार का?”, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. उर्वशीनं काही दिवसांआधी सोशल मीडियावर एक दर्दभरी शायरी लिहिली होती. टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये असताना उर्वशी देखील तिथेच होती. तेव्हा उर्वशी आणि रिषभ पंत यांच्या अफेअर्स चर्चांना उधाण आलं होतं. त्याचप्रमाणे उर्वशीनं तिचे साडीतील काही फोटो शेअर केले होते. ज्यात तिनं टिकली, सिंधूर, गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. सोबत प्रेम में पडी प्रेमिका को, सिन्दूर से प्रिय कुछ नही होता!! सारी रस्म रिवाज के साथ चाहिये, उम्रभर का साथ पिया तुमसे, अशी शायरीही शेअर केली होती.