जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Uorfi Javed: उर्फी जावेदचा विनयभंग; धक्कादायक खुलासा करत म्हणाली 'दारूच्या नशेत त्यांनी माझ्यासोबत...'

Uorfi Javed: उर्फी जावेदचा विनयभंग; धक्कादायक खुलासा करत म्हणाली 'दारूच्या नशेत त्यांनी माझ्यासोबत...'

उर्फी जावेद

उर्फी जावेद

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण फारच वेगळं आहे. नुकताच उर्फीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22  जुलै : ‘बिग बॉस ओटीटी’मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या उर्फी जावेदने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. आपल्या अतरंगी फॅशनमुळं उर्फी चर्चेत असते. सोशल मीडिया सेन्सेशन आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त शैलीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण तिच्या वक्तव्यांमुळे ती वादात देखील सापडते. आपल्या फॅशनने लोकांचा रोष ओढवून घेणाऱ्या उर्फीनं बॉलिवूड सेलिब्रिटी ते मोठमोठे फॅशन डिझायनर यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता उर्फी बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण फारच वेगळं आहे. नुकताच उर्फीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नुकतंच उर्फी मुंबईहून गोव्याला जात होती, त्याचवेळी फ्लाइटमध्ये काही मुलांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. उर्फीने स्वतः या घटनेची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. उर्फीने केलेला हा खुलासा ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

उर्फी जावेद 20 जुलै रोजी मुंबई विमानतळावर दिसली होती. ती सुट्टीसाठी गोव्याला जात होती. यादरम्यान तिला पापाराझींनीआपल्या कॅमेऱ्यातही कैद केलं. यावेळी उर्फीच्या बार्बी लूकनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तिने गुलाबी रंगात तिचे केस रंगवले होते. जेव्हा उर्फी फ्लाइटमध्ये पोहोचली तेव्हा त्याच फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांच्या एका ग्रुपनं तिला ओळखलं आणि तिच्यावर विचित्र कमेंट्स करण्यास सुरुवात केली. याविषयी तिने अनेकदा त्या मुलांची तक्रार केली. पण ते शांत बसले नाहीत. Maanayata Dutt : एकेकाळी सी ग्रेड चित्रपटात काम करायची संजू बाबाची बायको; तीन वेळा बदलून घेतलयं नाव उर्फी जावेदने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात काही मुलं दिसत आहेत. उर्फीने व्हिडिओसोबत लिहिले आहे की, ‘मी काल मुंबईहून गोव्याला जात असताना मला अशा शोषणाला सामोरे जावे लागले. व्हिडिओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवलं तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की, त्याचे मित्र नशेत आहेत. मद्यधुंद असल्यामुळे ते असं  आहेत. पण दारू पिऊन स्त्रीशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. मी एक सार्वजनिक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही.’ अशा शब्दात उर्फीने तिचा संताप व्यक्त केला आहे.

News18

उर्फीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर सोशल मीडिया गाजवल्यानंतर आता उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच एकता कपूरनं तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. ‘एलएसडी 2’ असं या चित्रपटाचं नाव होतं. आता उर्फीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फी आता तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तिला एलएसडी २ या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात