जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Maanayata Dutt : एकेकाळी सी ग्रेड चित्रपटात काम करायची संजू बाबाची बायको; तीन वेळा बदलून घेतलयं नाव

Maanayata Dutt : एकेकाळी सी ग्रेड चित्रपटात काम करायची संजू बाबाची बायको; तीन वेळा बदलून घेतलयं नाव

मान्यता दत्त

मान्यता दत्त

मान्यता ही संजय दत्तची तिसरी बायको आहे. आज तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22  जुलै : संजू बाबा म्हणजेच संजय दत्तच्या ची बायको म्हणजेच मान्यता दत्त. तिचं सौंदर्य पाहून अनेकांना भुरळ पडते. आज मान्यताचा वाढदिवस आहे.  22 जुलै 1978 रोजी मुंबईत जन्मलेल्या मान्यताने काही काळ दुबईतही घालवला, पण नंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मान्यता ही संजय दत्तची तिसरी बायको आहे. आज तिच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी. एकेकाळी मान्यताने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला. पण चित्रपटसृष्टीत तिचा काहीच जम बसत नव्हता. तेव्हा मान्यताने सी ग्रेड चित्रपटात देखील काम केलं. त्याचं झालं असं की मान्यता सुरुवातीला मुंबईत यारी रोडवर एका फ्लॅटमध्ये राहत होती. त्यादरम्यान त्याने ‘लव्हर्स लाइक अस’ नावाच्या सी ग्रेड चित्रपटातही काम केले. मात्र, संजय दत्तला भेटल्यानंतर मान्यताचे नशीब पालटले. लग्नानंतर संजय दत्तने सी ग्रेड चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. याशिवाय तिने प्रकाश झा यांच्या गंगाजलमध्ये आयटम नंबरही सादर केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मान्यता दत्त खऱ्या आयुष्यात मुस्लिम कुटुंबातील आहे. तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवताना तिने स्वत:चे नाव फिल्मी दुनियेसाठी सारा खान असे ठेवले होते. यानंतर, त्याने तिसऱ्यांदा आपले नाव बदलले आणि मान्यता दत्त अशी स्वतःची ओळख बनवली. एक निर्णय अन् सुपरस्टारचं बदललं आयुष्य; ‘या’ कारणामुळं अक्षय कुमारने बदललं नाव नितीन मनमोहन यांनी मान्यता आणि संजय दत्त यांच्या भेटीची व्यवस्था केली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. असं म्हटलं जातं की मान्यता तिच्या घरातून जेवण बनवायची आणि संजय दत्तसाठी सेटवर पोहोचायची. हळूहळू ओळखीने त्याच्या हृदयात स्थान निर्माण केले. 2008 मध्ये संजय दत्तने हिंदू रीतिरिवाजानुसार मान्यताला आपला जोडीदार बनवले. संजय दत्तचे हे तिसरे आणि मान्यताचे दुसरे लग्न आहे. संजय दत्त आणि मान्यतामध्ये थोडा थिडका नाही तर 21 वर्षांचा फरक आहे. मान्यता आणि संजय दत्त यांची भेट झाली तेव्हा संजय दत्त कठीण काळातून जात होता. तेव्हा मान्यताने त्याला साथ दिली. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात हिंदू पद्धतीनुसार गुपचूप लग्नगाठ बांधली. मान्यता यशस्वी अभिनेत्री बनू शकली नसली तरी आज ती फॅमिली बिझनेस सांभाळते. मान्यता बिझनेस वुमन  कोट्यवधी रुपये कमावते. तसंच ती संजय दत्तचं प्रोडक्शन हाऊस देखील सांभाळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात