‘रात्रीस खेळ चाले’ची टॉप 5 मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

‘रात्रीस खेळ चाले’ची टॉप 5 मध्ये दणदणीत एंट्री, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर

मागच्या अनेक दिवसांपूर्वी टॉप 5 मधून बाहेर पडलेली मालिका ‘रात्रीस खेळ चाले’नं मात्र या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये स्थान मिळवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : सध्या मराठी मालिकांमध्ये वेगळेपण पाहायला मिळत आहे. सर्वांची लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये एकीकडे राधिका आणि शनाया मिळून गुरुनाथला धडा शिकवण्याचा प्लान बनवत आहेत तर दुसरीकडे अभिजित राजे सोहमला वठणीवर आणण्याचे वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या टीआरपीमध्ये या मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला.

या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलं असून यामध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. मात्र या आठवड्यात एका नव्या मालिकेची टॉप 5 मध्ये एंट्री झाली आहे. पण या आठवड्यात ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत काहीशी घसरण झालेली पाहायला मिळाली.

VIDEO : Coronavirus मुळे सेलिब्रेटी बसलेत घरी, सलमान-कतरिनानं केलं ‘हे’ काम

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका या आठवड्याच्या टीआरपी मालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला आहे. मागच्या आठवड्यात ही मालिका चौथ्या स्थानावर होती.

SHOKING! अभिनेत्री जसलीन मथारू आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

मागच्या काही आठवड्यांपासून दुसऱ्या स्थानावर असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा शो मात्र तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. मागच्या आठवड्यात या शोबद्दल बराच वाद झाला. ऐतिहासिक महापुरुषांचे फोटो मॉर्फ केल्यानं या शोवर बरीच टीकाही झाली. कदाचित त्यामुळेच या शोला त्याचा फटका बसला आहे.

मिलिंद सोमण असा पडला स्वतःपेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताच्या प्रेमात!

मागच्या अनेक दिवसांपूर्वी टॉप 5 मधून बाहेर पडलेली हॉरर मालिका ‘रात्रीस खेळ चाले’नं मात्र या आठवड्यात टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. सध्या या मालिकेत बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडत असल्यानं प्रेक्षका पुन्हा या मालिकेकडे वळताना दिसत आहे. ही मालिका या आठवड्यात पाचव्या स्थानावर आहे. तर ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.

ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी...’

First published: March 19, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या